*सिरोंचातील वृद्ध कलावंतांनी घेतली माजी आमदार आत्राम आणि जि .प.उपाध्यक्ष कांकडलवार यांची भेट*

0
532
Google search engine
Google search engine

वृद्ध कलावंताना मानधन मिळवून देण्याची केली मागणी

सिरोंचा- विशेष प्रतिनिधी

. सिरोंचा येथील साई भजन मंडळाचे वृद्ध कलावंतांनी आज आविस नेते व अहेरीचें माजी आमदार दीपक दादा आत्राम आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजयभाऊ कांकडलवार यांची आज स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात भेट घेऊन वृद्ध कलावंतांना शासनाकडून मिळणाऱ्या मानधन मिळवून देण्यासाठी योग्य सहकार्य करण्याची सिरोंचा येथील वृद्ध कलावंत मेडी चंद्रय्या, बापू बंदेला, लक्ष्मण दुंपला, दुर्गय्या तलारी, गंगुलु येल्लेला, पर्सा बालकीष्टु, मदेशी पोचम, गंदम पोचम, येरोला किष्टय्या, तोकला राजान्ना, गरपट्टी पोचन्ना, आदी कलाकारांनी भेट घेऊन मागणी केले .

आविसच्या दोन्ही नेत्यांनी भेट घेतलेल्या वृद्ध कलावंतांना योग्य सहकार्य करण्याची ग्वाही दिली .
यावेळी जि. प.सदस्या अनिताताई आत्राम जि. प. महिला व बाल कल्याण समिती सभापती जयसुधा बानय्या जनगाम, पं. स.सदस्या शकुंतला जोडे , आविसचे ज्येष्ठ सल्लागार मंदा शंकर, आकुला मल्लिकार्जुनराव, आविस तालुका अध्यक्ष बानाय्या जनगाम, रवी सल्लमवार,ऍड. तिरुपती कोंडागोरला, मारोती गणपुरापु, श्याम बेज्जनीवार, कुम्मरी सडवली, किरण वेमुला, चौधरी समय्या ,लक्ष्मण गावडे सह आविस चे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्तित होते.