मामा तलावाचे नूतनीकरण आणि दुरुस्ती करण्याची शेतकऱ्यांची मागणी -माजी आमदार आत्राम व  जि. प.उपाध्यक्ष कांकडालवार यांना शेतकऱ्यांच निवेदन

0
611
Google search engine
Google search engine

सिरोंचा / विशेष प्रतिनिधी –

तालुक्यातील मेडारम ग्राम पंचायत हद्दीत असलेल्या मामा तलावाची नूतनीकरण आणि पूर्णतः दुरुस्ती करण्याची मागणी या तलावाच्या पाण्यावर आधारित शेती करणाऱ्या मुरलीक्रिष्णा कासर्लावार, मारगोनी सत्यनारायण, प्रभाकर कोत्तागट्टू, वेमुला रमनय्या, कुम्मरी बापू, बोद्यांलू रंगुवार, ब्रम्हानंदम कोत्तागट्टू, कुम्मरी श्रीनिवास, गड्डम मदनय्या आदी शेतकऱ्यांनी माजी आमदार दीपक आत्राम आणि जि. प. उपाध्यक्ष अजयभाऊ कांकडालवार यांना भेटून निवेदन देऊन मागणी केले.
शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात, या तलावाखाली जवळपास शंभर एकर शेतजमीन असून तलावाची नूतनीकरण आणि आवश्यक दुरुस्ती न केल्याने तलावात पाणी साठवणूक होत नसल्याने शंभर एकर शेतजमीन अनेक वर्षापासून कोरडा पडलेला आहे . या तलावाची दुरुस्तीची काम या पूर्वी नरेगा या योजनेत मंजूर असून नोंदणीकृत मजूर या कामासाठी येत नसल्याने या तलावाची नूतनीकरण आणि खोलीकरण आणि दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधी मंजूर करून तलावाची स्वतंत्र यंत्रणा किंवा कंत्राटदारमार्फत खोलीकरण , गेट बांधकाम, वेस्टवेहर दुरुस्ती, तलावाची पूर्णतः दुरुस्ती केल्यास तब्बल शंभर एकर शेतजमीन सिंचनाखाली येणार असल्याची माहिती निवेदनातून दिली आहे . निवेदनाची प्रत जिल्हाधिकारीसह मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्ह्यातील पदाधिकारी आणि सनद अधिकाऱ्यांनासुद्धा पाठविले आहे .
तमंदाला येथील मामा तलावासंदर्भातील पूर्ण माहिती घेऊन येत्या तीन महिन्यात तलावाची नूतनीकरण आणि दुरुस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन जि. प.उपाध्यक्ष श्री अजयभाऊ कांकडालवार यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले .
यावेळी जि.प.सदस्या अनिताताई आत्राम, जि. प. महिला व बाल कल्याण समिती सभापती जयसुधा बानय्या जनगाम , पं. स. सदस्या शकुंतला जोडे , आविस सल्लागार मंदा शंकर, बाजार समिती संचालक आकुला मल्लिकार्जुनराव, सिरोंचाचे माजी उपसरपंच रवी सल्लमवार, पेंटीपाका उपसरपंच कुम्मरी सडवली, सूंकरेल्ली सरपंच चौधरी , सिरकोंडाचे उपसरपंच लक्ष्मण गावडे , मारान्ना इंगीली, समय्या, गादे सोमय्या, मारोती गणपुरापु, किरणकुमार वेमुला, तिरुपती दुर्गम , श्रीशैलम मोरला, श्याम बेज्जनींवार, ओमकार ताटीकोंडावार, नागराजू इंगीली, येदुरु समय्या, जनगाम सडवली, नरेश धर्मी, लक्ष्मण बोल्ले सह आविसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्तित होते.