सिरोंचा येथे महामानव भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम यांची जयंती

0
520
Google search engine
Google search engine

सिरोंचा:

– भारताचे प्रथम शिक्षणमंत्री महामानव भारतरत्न मौलाना अबुल कलाम यांची जयंती राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून सिरोंचा येथे काल शनिवारी (दि.११) साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मो. मिरजहान इमाम हे होते. यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी भारत नंदनवार, नगरसेवक अब्दुल रफक पाशा, उपाध्यक्ष रमजान खान, माजी सदस्य मो. इशाख इमाम, हुसेन खान आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवर वक्त्यांनी कलाम साहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकला. दरम्यान, जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थिनी करिष्मा सय्यद आणि प्रणिता ठाकूर यांची राष्ट्रीय कबड्डी चमूत निवड झाल्याबद्दल मान्यवरांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रक्तदान शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. १६ जणांनी रक्तदान केले
संचलन मो. इमरान यांनी केले. प्रास्ताविक शेख इरफान यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सय्यद सलाम सत्तार, अयुब खान, सय्यद सलाम,माजिद अली, वसीम खान,फारूख खान, याकूब बाबा, सय्यद कव्वाल, शेख सलीम, मो. इर्शाद यांनी सहकार्य केले.