आरोपी शिक्षक इंगोले याला २७ नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी – गळा आवळून केली पत्नीची हत्या

0
716
Google search engine
Google search engine

कविता कटकतलवारे (इंगोले) हत्या प्रकरण

चांदूर रेल्वे/ शहेजाद खान – 

स्वतःच्या पत्नीचा गळा आवळून हत्या केल्या प्रकरणी अटकेत असलेला शिक्षक पती किर्तीराज
इंगोले याला नांदगाव खंडेश्वर पोलीसांनी आज (ता.१३) पोलीस कोठडी संपल्यानंतर
न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला २७ नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी
सुनावली आहे.

 

स्थानिक मेहेरबाबानगरातील रहिवाशी कविता किर्तीराज इंगोले (कटकतलवारे)(वय ४०) या
शिक्षिका म्हणून नगर परिषद छ.शिवाजी महाराज प्राथमिक शाळेत मागील १० वर्षापासुन
कार्यरत होत्या. मंगळवारी (ता.७) शाळा संपल्यानंतर त्या सायंकाळी चांदूर रेल्वे वरून एसटी
बसने नांदगाव खंडेश्वरला गेल्या होत्या. परंतु दुसऱ्या दिवशी नांदगाव खंडेश्वर लगतच्या येणस
गावाजवळ त्यांचा मृतदेह सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्याना बुधवारी (ता.८) आढळला.

 

 

मृतकचा भाऊ गजानन कटकतलवारे यांनी नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनला दिलेल्या
तक्रारीवरून नांदगाव पोलीसांनी मृतकचे पती किर्तीराज इंगोलेला बुधवारीच ताब्यात घेतले
होते. चौकशीत आरोपी इंगोले ने पत्नीचा गळा आवळून हत्या केल्याचे कबुली जवाब दिला.
आरोपी किर्तीराज इंगोले तालुक्यातील आमला विश्वेश्वर येथील शाळेत सहाय्यक शिक्षक
पदावर कार्यरत आहे. घटनेच्या दिवशी ७ नोव्हेंबरला त्याने सुट्टी घेऊन दिवसभर पत्नीच्या
हालचालीवर लक्ष ठेवले. कविता मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता शाळा सुटल्यानंतर
कविता एसटी बसने नांदगाव खंडेश्वरला पोहचली. किर्तीराज पहिलेच नांदगाव बस स्टँडवर
पोहचलेला होता. त्याने कविताला दुचाकीवर बसवुन नांदगाव-चांदूर रेल्वे मार्गावरील येणस
गावाजवळ नेले. येथे दोघात पैशावरून चांगलाच वाद झाला. रागाने भडकलेल्या किर्तीराजने
पत्नी कविताचा गळा दाबला. यामध्ये कविताचा जागीच मृत्यु झाला. मृत कविताला तिथेच
टावूâन लगेच रात्री किर्तीराज इंगोले दुचाकीने चांदूर रेल्वेला परत आला.

 

 

शवविच्छेदन अहवालात
मृतक कविताचा श्वास कोंडल्यामूळे मृत्यू झाल्याचा उल्लेख आहे. आरोपी किर्तीराज ला
नांदगाव खंडेश्चर न्यायालयाने १३ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आज(ता.१३)
नांदगाव पोलीसांनी आरोपी किर्तीराज इंगोले याला न्यायालयात हजर केले. न्यायाधिशांनी
त्याला २७ नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असुन त्याची रवानगी अमरावती
जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे.