खोलापूर येथील राष्ट्रीय शेतकी विद्यालयात बालक दिन संपन्न

0
683
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी – गजानन खोपे

वाठोडा शुक्लेश्वर /

भातकुली तालुक्यातील खोलापूर येथील राष्ट्रीय शेतकी विद्यालय मध्ये बालक दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,तसेच पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे आणि पुजन आणि हारर्पण अध्यक्ष मुख्याध्यापक श्री संजय काळे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी प्रास्ताविक श्री कंडाळे सर यांनी केले. विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. श्री कैलाश गजभिये, पी टी पारडे, जी एन मानकर, एन एम ठवरे, कविटकर यांनी आपले मनोगते व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षिय भाषणातून श्री काळे म्हणाले की, पं नेहरुंच्या आदर्श प्रत्येकांनी घेतला पाहिजे. नेहरूजी जास्तीत जास्त मेहनत करित. व्यायामसुद्धा करत. आपलं सर्वस्व त्यांनी देशाला अर्पण केले कार्यक्रमाचे संचलन यश भटकर या विद्यार्थांनी केले. स्वाती भोंगे, मोहोड,नवले, तसेच विद्यार्थी आणि शिक्षकत्तरी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.