(म्हणे) पद्मावती चित्रपटाला विरोध म्हणजे सिनेसृष्टीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला विरोध ! – इंडियन फिल्मस् अ‍ॅण्ड टेलिव्हिजन डायरेक्टर असोसिएशन

0
1129
Google search engine
Google search engine

मुंबई – पद्मावती चित्रपटाला होणारा विरोध हा सिनेसृष्टीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला केला जाणारा विरोध आहे. चित्रपट प्रदर्शित करण्याविषयी निर्णय घ्यायला सेन्सॉर बोर्डाची निर्मिती केली आहे; मात्र पद्मावती चित्रपटाला होणारा विरोध पाहून याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी एकत्र येणे आवश्यक होते. या सूत्राकडे सरकारने गांभीर्याने पहाणे आवश्यक आहे. या निमित्ताने चित्रपटसृष्टीला सुरक्षेचीही हमी हवी आहे. चित्रपटसृष्टीतील कलाकारांवर टीका तर होतच असते; पण आता लोक लाठ्या घेऊन येते आहेत

आता आम्ही कोणाकडे साहाय्य मागायचे ? हा प्रश्‍न निर्माण झाला आहे, असे इंडियन फिल्मस् अ‍ॅण्ड टेलिव्हिजन डायरेक्टर असोसिएशनने (इफ्दाने) आयोजित पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटामुळे निर्माण झालेल्या वादाविषयी पत्रकार परिषद घेऊन इफ्दाने आपली भूमिका घोषित केली. इफ्दाचे माजी अध्यक्ष अशोक पंडित यांनी कोणाचे पाऊल किती अपायकारक ठरेल, याचा अंदाज येत नाही. त्यामुळे सरकारकडून साहाय्याची अपेक्षा आहे, असे सांगितले.

या वृत्तीचा निषेध करण्यासाठी १६ नोव्हेंबरला फिल्मसिटीच्या प्रवेशद्वारावर सकाळी ११ वाजता लाइट आणि स्पॉटबॉय युनियनच्या वतीने १५ मिनिटे काम थांबवण्यात येणार आहे, असे युनियनचे अध्यक्ष गंगेश्‍वर श्रीवास्तव यांनी सांगितले.