पद्मावतीचा ट्रेलर दाखवण्यावरून कोटा (राजस्थान) येथील मॉलमध्ये करणी सेनेकडून तोडफोड

0
573
Google search engine
Google search engine

कोटा – येथील आकाश मॉलमध्ये पद्मावती चित्रपटाचा ट्रेलर दाखवण्यात आल्याने करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी मॉलची तोडफोड केल्याची घटना १४ नोव्हेंबरला घडली. या प्रकरणी पोलिसांनी ८ कार्यकर्त्यांना अटक केली आहे. करणी सेनेच्या विरोधानंतरही अन्य चित्रपटांच्या मध्यंतराच्या वेळी हा ट्रेलर दाखवण्यात आला होता. यावर राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया म्हणाले की, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला विरोध करण्याचा अधिकार आहे; मात्र हा विरोध लोकशाही मार्गानेच करायला हवा. जर कोणी कायदा हातात घेत असेल, तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.