महाराष्ट्र दालनात ‘मेक इन महाराष्ट्रा’चे प्रतिबिंब : श्री प्रविण पोटे पाटील

0
610
Google search engine
Google search engine

‘मेक इन इंडिया’ च्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ‘मेक इन महाराष्ट्र’ ही संकल्पना राज्यात राबविली जात असून त्याचे प्रतिबिंब महाराष्ट्र दालनात दिसते, अशी प्रतिक्रिया उद्योग राज्य मंत्री श्री पोटे यांनी व्यक्त केली.
हजारो उद्योजक या मेक इन महाराष्ट्राच्या माध्यमातून तयार झालेले आहेत. त्यापैकी 60 उद्योजक या दालनात आहे. महाराष्ट्रामध्ये इतर राज्याच्या तुलनेत अधिक औद्योगिक गुंतवणूक झालेली आहे. आर्थिक वर्ष 2014-15 च्या तुलनेत यावर्षी जवळपास 3.5 लाख कोटीपेक्षा अधिक गुंतवणूक राज्यात झालेली आहे. उद्योग उभारणीसाठी लागणा-या नाहरकत प्रमाणपत्रांची संख्या सुरूवातीला 86 च्या जवळपास होती ती केवळ 25 पर्यंत आणलेली आहे. उद्योजकाला ताबडतोब काम सुरू करता यावा यासाठी पुर्ण पाठींबा राज्य सरकारकडून देण्यात येतो, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री श्री प्रवीण पोटे यांनी महाराष्ट्र दालनाच्या उद्घाटनानंतर माध्यमाशी बोलताना दिली. यासह महाराष्ट्र दालनाची प्रतिकृती ही विमानाच्या आकाराची आहे. कॅप्टन अमोल यादव यांनी महाराष्ट्रात विमान उद्योग निर्मितीचा कारखाना उभाण्यास सुरूवात केली असून याच संकल्पनेवर हे महाराष्ट्र दालन उभे आहे अशी माहिती श्री पोटे यांनी दिली.