आ.डॉ.अनिल बोन्डे यांनी केली जखमींची मदत

0
1016
Google search engine
Google search engine

.

मोर्शी : काल गुरुवार 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास मोर्शी – अमरावती रोडवरील निंभी गावालगत अल्टो व मोटार सायकलचा अपघात झाला, यामध्ये 2 मोटार सायकलस्वार जखमी झाले होते.

परंतु त्यांच्या अपघाताला पाहण्यासाठी जाणाऱ्या – येणा-यांनी एकच गर्दी केली होती. मात्र याच वेळी मोर्शी – वरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.अनिल बोन्डे व डॉ. वसुधा बोन्डे ह्या अमरावती वरून मोशीकडे नियोजनबद्ध कार्यक्रमासाठी जात असतांना त्यांना निंभी गावाजवळ अपघात दिसला, या घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसल्याने त्यांनी आपल्या ड्रायव्हर गाडी थांबविण्यास सांगितले, व खाली उतरून माहिती जाणून घेतली व जिल्हा सामान्य ग्रामीण रुग्णालय अमरावतीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.निकम यांना सविस्तर माहिती देऊन दोन्ही जखमींना उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.

यावेळी मदतीचा हात म्हणून आमदार डॉ.अनिल बोन्डे व डॉ.वसुधा बोन्डे यांनी पुढाकार घेतल्याने दोन्हीं ही जखमी सध्या सुखरूप असल्याची माहिती डॉ.निकम यांनी आमदार मोहदयांना दिली.