काजळसर येथे काँगेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न

0
823
Google search engine
Google search engine

शंकरपूर / महेश कोडापे-

आज शनिवार ला काजळसर इथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला या कार्यक्रमात काँग्रेस म्हणजे काय आणि काँग्रेस नि आजपर्यंत काय केलं आणि सध्याचा भाजपा सरकारनी काय केलं ह्या बद्दल मार्गदशन करण्यात आले . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.माजी आमदार डॉ. श्री अविनाशभाऊ वारजूकर हे लाभले , कार्यक्रमाचे उदघाटन म्हणून मा. प्रकाशजी देवतळे अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी चंद्रपूर हे उपस्थित होते, कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून जी.प.चंद्रपूर गटनेते सतिशभाऊ वारजूकर , माजी.तालुका अध्यक्ष प्रा.राम राउत सर , मा. संजयजी डोंगरे , राजेशजी कांबळे, मा. खोजराजजी मरस्कोल्हे माजी प.स.सदस्य नागभीड व आजी जी.प. सदश्य , तसेच विजयजी गावंडे हे उपस्थित होते तसेच हजारो कार्यकर्ते उपस्थित होते .

यावेळी सर्व पाहुणे मंडळीनि मार्गदर्शन केले
तसेच या वेळी राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष उषाताई गावंडे यांनी काँग्रेस मध्ये सतिषभाऊ वारजूकर यांच्या नेतृत्वावर विस्वास ठेऊन काँग्रेस मध्ये प्रवेश केला तसेच काही युवाशक्ती कार्यकर्त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला