*सेवा प्रोजेक्ट बोपापुरने शेतक-यांचे प्रश्न निवेदन देवून मांडले*

0
1116
Google search engine
Google search engine

बोपापूर / श्री प्रमोद नैकेले/-

शेतकरी हा भटकरी झाला पाहिजे असेच काही चित्र आज सर्वांना दिसत आहे…
सर्व जण म्हणतात शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे म्हणजेच जगाला पोसणारा शेतकरी आहे
पण आज चित्र उलटेच दिसत आहे सर्वांकडून हेच ऐकायला मिळते की आता काही शेतकऱ्याचं खर नाही
दिनांक 17 नोव्हेंबर 2017 ला बोपापुर येथील शेतकर्यांनी नायगाव,बोर्डी,वासनी, मूकींदपूर,निजामपूर या गावातील शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार,sdo, ता.कृषी अधिकारी व.कृषी अधिकारी पंचायत समिती अचलपूर येथे निवेदन देण्यात आले.या विषयावर मा.तहसीलदार जैन सर सोबत चर्चा केली असता जिल्हाधिकारी यांच्याशी त्वरितसंपर्क करून पंचनामे करू असे सांगितले.

BT कपाशी वरील बोन्ड अळीच्या प्रकोपामुळे झालेल्या नुकसानीच्या त्वरित पंच नामा करून कमीत कमी हेक्टरी 25 हजार एवढी मदत कपाशी धारक शेतकर्याना द्यावी जेणेकरून त्याला थोडे अर्थ साहाय्य होईल.

टीप:
शेतकऱ्यांनी आता लक्ष नैसर्गिक शेतीकडे द्यावे म्हणजेच देशी बियाणे देशी उपचार ,
कारण सरकार शेतीकडे लक्ष देईल की नाही देईल पण आपल्याला उत्पन्न कमी झाले तरी चालेल पण उत्पन्न खर्च त्याही पेक्षा कमी करता येते बस फक्त आपली मानसिकता थोडी बदलावी लागेल ,
आज सुरुवात तर करूया बघूया….या जीवघेण्यास्पर्धेतून मार्ग काढुया.
कमी खर्च, मोजकी गरज,उत्पन्नात गुणवत्ता अधिक असे सूत्र करूया.