सिटी हायस्कूल अचलपूर येथे अपूर्व विज्ञान मेळावा संपन्न

0
1330
Google search engine
Google search engine

अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-

दिनांक १८नोव्हेंबर ला सकाळी ७.३० ते १२.३० पर्यंत अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन केले होते.अपूर्व विज्ञान मेळाव्यामध्ये एकूण साठ प्रतिकृती प्रदर्शित करण्यात आल्या होत्या . नववीतील विद्यार्थी ,विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सचिव मा. दिपकराव देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगीसंस्थेच्या अध्यक्षा माधुरीताई देशमुख, पंचायत समिती अचलपूरच्या गटशिक्षणाधिकारी मा. सौ.काटपातळ मँडम ,विषय तज्ज्ञ मा. जहाआरा त्यांचे सहकारी , शाळेचे मुख्याध्यापक श्रीमान सुनिल अंजनकर, जिल्हा विज्ञान मंडळाचे सचिव श्री विनायक ताथोड सर्व तालुक्यातील अन्य विज्ञान शिक्षक व पदाधिकारी उपस्थित होते .अपूर्व विज्ञान मेळाव्यामध्ये मध्ये शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन अतिशय आनंदाने टाकाऊतून टिकाऊ प्रतिकृती व ज्ञान रचनावादी साहित्य तयार करून वैज्ञानिक तत्त्व सर्वांना समजून सांगितले . या मेळाव्याचे परीक्षण करून गुणानुक्रमे उत्कृष्ट तीन प्रतिकृती तालुकास्तरीय अपूर्व विज्ञान मेळाव्याकरिता निवड केली अपूर्व विज्ञान मेळाव्यांमध्ये शाळेतील विज्ञान शिक्षक श्रीमान लिपने सर , सोै.नाकील मॅडम व सर्व शिक्षक , शिक्षिका यांनी यशस्वीतेकरिता अथक परिश्रम घेतले .शेवटी सर्वांचे आभार मुख्याध्यापकांनी व्यक्त केले .