*युवा गौरव पुरस्काराने शेख इम्रान सन्मानित*

0
693
Google search engine
Google search engine

फोटो – :शेख इम्रान याना युवा गौरव पुरस्काराने सन्मानित करतांना मान्यवर .

बुलढाणा: –
युवा शक्ती पत्रकार संघ व साप्ताहिक औरंगाबाद युवा यांच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा मानाचा युवा गौरव पुरस्कार या वर्षी मोताळा तालुक्यातील कोथळी येथील पत्रकार शेख इम्रान शेख उस्मान यांना औरंगाबाद येथे दिनांक 17 नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण नाटयगृह येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
शेख इम्रान यांनी आपल्या कार्यक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्य बद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे शेख इम्रान यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक विषयावर प्रकाशझोत टाकला .
शेख इम्रान हे सामजिक कार्यात सुद्धा अग्रेसर असून त्यांच्या कार्याची दखल घेत त्याना भारत सरकार च्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालया अंतगत नेहरू युवा केंद्र च्या माध्यमातून जिल्हा युवा पुरस्कार देऊन सुद्धा गौरवन्यात आले आहे त्यांना याअगोदर आदर्श शिक्षक पुरस्कार सुद्धा देण्यात आला आहे.सदर युवा गौरव पुरस्कार वक्फबोर्डाचे अध्यक्ष एम एम शेख, मौलाना आझाद अल्पसंख्यांक विकास महामंडळाचे संचालक ईब्राहिम पठाण, दैनिक औरंगाबाद टाईम्सचे संपादक शोहेब खुसरो, दैनिक हिंदुस्तानचे संपादक नायाब अन्सारी, संपादक अब्दुल कय्यूम,औरंगाबाद शहराचे महापौर नंदकुमार घोडेले,पुरवठा अधिकारी डॉ भारत कदम, पोलिस निरीक्षक फहीम हाश्मी, हेमंत कदम, युवानेते नुसरत खान, बि के पठाण, डॉ. शोहेब हाश्मी, डॉ शकील शेख, अली भिमानी, आकेब रजवी, शेख अथर,आदीच्या हस्ते सम्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन हा पुरस्कार शेख इम्रान यांना प्रदान करण्यात आला शेख इम्रान यांना हा पुरस्कार मिळताच पत्रकार मित्र परिवारातून त्यांचे अभिनंदन होत आहे.