चांदुर बाजार येथील स्वच्छता आणि पथ दिव्याच्या प्रश्नावर युवासेना सेना, शिवसेना आक्रमक – 10 दिवसात योग्य निर्णय न घेतल्यास  आंदोलनाचा इशारा

0
896
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार / बादल डकरे –

स्थानिक चांदुर बाजार येथील विविध समस्येवर शिवसेना आणि युवासेना ही आक्रमक झाली असून तक्रारींवर 10 दिवसात तोडगा न काढल्यास आंदोलनं करण्याचा इशारा ही देण्यात आला आहे.
स्थानिक शहरातील मुख्य आठवडी बाजार परिसरात कचऱ्याचे ढिगारे,सोनार लाइन आणि पाणीपुरी चौपाटी,मटन मार्केट,तसेच नगर परिषद च्या सार्वजनिक शौचालय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाण झाली असून त्यामुळे अनेक नागरिक याना दुर्गंधी येत आहे.
जनता ही स्वच्छता कर भरतात तसेच स्वच्छता च्या नावावर अनेक योजना सांगून जनतेकडून त्याची वसुली केली जाते मात्र त्यांना स्वच्छता का नाही अशा ही प्रश यावेळी विचारण्यात आला.तसेच चांदुर बाजार येथील हिंदू स्मशानभूमीत लाईट ची व्यवस्था नसल्याने बॅटरी आणि गाडीच्या लाइट मध्ये अंतिम संस्कार करावा लागत आहे त्यामुळे यावर लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा याकरिता शिसेनेने आणि युवसेना यांनी मुख्याधिकारी याना निवेदन देण्यात आले आणि 10 दिवसात जर या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शिवसेना युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी युवासेना तालुका अध्यक्ष शैलश पांडे,उपतालुका प्रमुख पवन राऊत,शिवसेना शहर अध्यक्ष अजय शिनगारे,बाळासाहेब झोलेकर,शहर प्रमुख सागर सेवतकर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.