भिसी प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांची  नियुक्ती – जी.प सदस्य ममता डुकरे यांचा  प्रयत्नांना  यश

0
620
Google search engine
Google search engine

चिमूर / महेश कोडापे/-

चिमूर तालुक्यातील भिसी हे मोठं गाव असून आजू बाजू चे ग्रामीण भागातील गोर गरीब रुग्ण हे उपचारासाठी भिसी प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन उपचार करीत असतात परंतु या केंद्रात अधिकारी व कर्मचारी याची रिक्त पदे असून विविध कर्मचारी पदे रिक्त असल्याने रुग्ण व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून प्राथमिक आरोग्य केंद्रात वैधकीय अधिकारी व इतर कर्मचारी पदे भरण्याची मागणी जी प सदस्य ममता डुकरे यांनी जी प अध्यक्ष देवराव भोंगळे याना दिलेल्या निवेदनातून केली होती त्यामुळे येथे महिला वैद्यकीय अधिकाऱयांची नियुक्ती देण्यात आल्याने डुकरे याच्या प्रयत्न ला यश आले आहे .
भिसी हे गाव तालुक्याच्या शेवट असून या गावाच्या आजूबाजूचे रुग्ण आपला उपचार करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात येतात परंतु या केंद्रात वैधकीय अधीकारी ची कमतरता असून इतर कर्मचारी पदे रिक्त आहे त्यात वैद्यकीय सहायक अधिकारी ,औषधी निर्माण अधिकारी , आरोग्यसेविका स्त्री पद एक ,आरोग्यसेवक पदे चार त्यात उपकेंद्र सावरला ,जाम गाव ,भिसी ,आबेनेरी ,आरोग्यसेविका स्त्री एक ,उपकेंद्र सावरला, कनिष्ठ लिपिक एक ,परिचर एक असे पदे रिक्त आहे जनतेचे आरोग्य सुरळीत राहावे यासाठी प्रशासनाने भिसी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरण्याची मागणी जी प सदस्य ममता डुकरे यांनी केली असून निवेदन जी प अध्यक्ष, आरोग्य सभापती जी प ,उपमुख्यकार्यकारी अधिकारी ,व जिल्हा आरोग्य अधिकारी याना दिला होता तेव्हा प्रशासनाने दखल घेऊन भिसी प्राथमिक आरोग्य केंद्राला महिला डाक्टर अंशुल जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे .