शिक्षण म्हणजे सुप्त गुणांचा विकास इग्नोच्या परिचय सभेमध्ये डॉ.जी.एल.गुल्हानेे यांचे प्रतिपादन

0
1593
Google search engine
Google search engine

अमरावती –
मनुष्याला केवळ माहिती असणे म्हणजे ज्ञान नव्हे. जी माहिती वर्तमान, भविष्यातील समस्यांचे निराकरण करू शकते, ज्या माहितीमुळे उदरनिर्वाह होऊ शकतो ती माहिती ज्ञान आहे आणि ज्ञान हे शिक्षणातून प्राप्त होते. शिक्षण म्हणजे सुप्त गुणांचा विकास होय असे प्रतिपादन डॉ. जी.एल. गुल्हाने, विभागप्रमुख तथा माजी संचालक, दूर शिक्षण संस्था, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ यांनी केले. इंदिरा गाधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या अमरावती येथील अभ्यास केंद्राद्वारे आयोजित जुलै 2017 या सत्राकरिता नव्याने प्रवेश विद्याथ्र्याच्या परिचय सभेमध्ये प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर सभेच्या अध्यक्षस्थानी अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ.एस.डी. कतोरे आणि विशेष अतिथी म्हणून डॉ.मरियम थॉमस उपस्थित होते.

डॉ.गुल्हाने पुढे म्हणाले की, सर्वच माहिती ज्ञान होऊ शकत नाही. पुस्तकांमधून प्राप्त होणारी माहिती ही ज्ञान आहे. इग्नोची अध्ययन सामुग्री (स्टडी मटेरीअल) सविस्तर आणि तज्ञ लेखकांकडून तयार केलेली आहे. ह्रा पुस्तकातून मिळणारे ज्ञान कौशल्य विकसित करण्यास मदत करते. विद्याथ्र्यांनी निरंतर शिक्षण घेत राहावे कारण शिक्षणामुळे व्यक्तीमधील सुप्त गुणांचा विकास होत असतो व त्याची व्याप्ती वाढत असते. इग्नोच्या अभ्यासाच्या पुस्तकातून विद्याथ्र्यांना कौशल्य विकास करण्यास भरपूर मदत होते.

अध्यक्षीय भाषणात डॉ. कतोरे म्हणाले, की इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची अभ्यास केंद्रे भारतभर व परदेशात सुद्धा आहेत. इग्नोचे सर्बच अभ्यासक्रम जगभर मान्यताप्राप्त आहेत. अभ्यासकेंद्राद्वारे साधारणत: रविवारी आयोजित करण्यात येत असलेल्या काऊन्सिलींग सेशन्सला विद्याथ्र्यांनी हजर राहावे आणि शैक्षणिक सल्लागार यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार वेळेचे नियोजन करून अभ्यासक्रम पूर्ण करावेत.
सभेची सुरुवात व्यासपिठावरील मान्यवरांच्या हस्ते कर्मयोगी संत गाडगे बाबा आणि भारतरत्न प्रियदर्शनी स्व. इंदाराजी गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण आणि दीपप्रज्वलन करून झाली. ह्रा प्रसंगी उपस्थित इग्नोचे मान्यता प्राप्त शैक्षणिक सल्लागार आणि माजी विद्यार्थी प्रा. सुभाष सहारे यांनी विद्याथ्र्यांना अभ्यासक्रम किमान वेळेमध्ये पूर्ण करण्याचे दृष्टीने सत्रीय कार्य कशा पद्धतीने पूर्ण करावे आणि परीक्षेची तयारी कशा पद्धतीने करावी ह्राबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन अभ्यासकेंद्राचे सहायक श्री गजानन पंचवटे यांनी केले. सभेला इग्नोचेे मान्यता प्राप्त शैक्षणिक सल्लागार डॉ.संदीप गवई, डॉ.के.पी.पाटील, ़डॉ.डी.वाय.चाचरकर, डॉ.दिपीका दामाणी, डॉ. दिनेशचंद्र राऊत तसेच अभ्यासकेंद्रातील कर्मचारी वर्ग सहायक श्री शशिकांत खाचने, श्री डी.पी.पाटील आणि नव्याने प्रवेशित विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.