ग्रामसभेला सरपंच, ग्रामसेविका व पं.स.अधिकाऱ्यांची दांडी – मुनादी देऊनही निमगव्हाणची ग्रामसभा झाली नाही

0
686
Google search engine
Google search engine

बिडिओंना निवेदन देतांना ग्रामस्थ

चांदूर रेल्वे / शहेजाद खान  –

पंचायतराज व्यवस्थेमध्ये ग्रामसभेला अत्यंत महत्व आहे.असे असतांना चांदूर रेल्वे तालुक्यातील निमगव्हाण
येथील ग्रामपंचायतीने ग्रामसभेची मुनादी दिली.मात्र या सभेला चक्क सरपंचा,ग्रामसेविका व पं.स.अधिकाऱ्यांनी
दांडी मारली तर उपस्थित ग्रा.पं.सदस्यांनी हात वर केले.त्यामूळे निमगव्हाण येथील १ मे महाराष्ट्र दिनीआयोजित
ग्रामसभा झाली नाही.त्यामूळे संतप्त झालेल्या ग्रामावासीयांनी मंगळवारी गटविकास अधिकारी व तहसीलदार
यांना निवेदन देऊन सर्व ग्रा.पं.सदस्यांना अपात्र घोषीत करण्याची जोरदार मागणी केली आहे.
१ मे महाराष्ट्र दिनी निमगव्हाण येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.त्याकरीता निमगव्हाण ग्रा.पं.ने
गावात मुनादी देऊन ग्रामसभेची माहिती ग्रामस्थांना दिली.त्यामूळे गावातील सर्व ग्रामस्थ ग्रामसभेसाठी जमले.सर्व
ग्रा.पं.सदस्य उपस्थित झाले.परंतु सरपंच स्वप्ना संजय आंबटकर व ग्रामसेविका रश्मी कढाणे तसेच ग्रामसभा
घेण्यासाठी नेमलेले केंद्रप्रमुख कुऱ्हळकर हे अधिकारी मात्र ग्रामसभेला पोहचले नाही.त्यामूळे उपस्थित
ग्रा.पं.सदस्यांना ग्रामसभाघेण्याची विनंती केली.परंतु त्यांनी हात झटकले.मुनादी देऊन ठरविल्या प्रमाणे ग्रामसभा
न झाल्याने संतप्त ग्रामस्थानी सरपंचावर सर्व सदस्यांना अपात्र घोषीत करण्यात यावे यासाठी (ता.२)
चांदूर रेल्वे पंचायत समिती व तहसील कार्यालय गाठून मागण्याचे निवेदन दिले व दोषीविरूध्द कडक कारवाई
करण्याची मागणी गजानन मोहोड यांच्यासह निमगव्हाण ग्रामस्थांनी
रेटून धरली.


प्रकरणाची चौकशी करणार-बिडीओ अमोल अंदेलवाड
या संपूर्ण प्रकरणाचा प्रथम चौकशी करून यातील दोषी विरूध्द कारवाई करणार असल्याचे बिडीओ अमोल अंदेलवाड
यांनी आमच्या प्रतिनिधी बोलतांना सांगीतले.



 सरपंचा आंबटकर


सरंपचा सपना आंबटकर यांचा तडकाफडकी राजीनामा

मागील अनेक महिण्यापासून निमगव्हाण ग्रामपंचायत कामकाजमध्ये गैरहजर असणाऱ्या सरपंचा सपना संजय आंबटकर यांनी २ मे रोजी बिडीओ अंदेलवाड व तहसीलदार राजगडकर यांच्याकडे सरपंच व ग्रा.पं.सदस्य पदाचा राजिनामा दिला.सरपंचा सपना आंबटकर या मागील काही महिण्यापासून आजारी होत्या.त्यामूळे त्यांचे मानसिक संतुलन ठिक राहत नव्हते.याबाबत त्यांनी याआधी २५/०८/१६ मध्ये दोन महिणे कामकाजास गैरहजर राहत असल्याचे चांदूर रेल्वे पंचायत समिती यांना लेखी कळविले होते.याबद्दल शासन सेवक ग्रामसेविका रश्मी कढाणे यांनी पंचायत समिती कार्यालयाला वेळोवेळी कळविणे गरजेचे होते.निमगव्हाणचे उपसरपंच उत्तम इंगळे हे मयत
झाल्याने उपसरपंच पद रिक्त आहे.त्यामूळे सरपंचा सपना आंबटकर यांच्या गैरहजरीत ग्रामसेविका रश्मी कढाणे यांनी ग्रा.पं.चा कामकाज कसे चालविले हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होते.जबाबदार पदाधिकारी हजर नसल्याचे त्यांनी ग्रा.पं.व पंचायत समिती प्रशासनाला का लेखी कळविले नाही.असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. ग्रामसेविका यांनी ग्रामस्थ व प्रशासनाची दिशाभूल केल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे.