बाबाकडे उपचारासाठी जाणाऱ्या युवकाने विहिरीत उडी घेवुन केली आत्महत्या

0
645
Google search engine
Google search engine

यवतमाळ /महागांव :

 

बाबाकडे उपचारासाठी जाणाऱ्या युवकाने विहिरीत उडी घेवुन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास मौजा आनंदनगर ता.महागांव येथे घडली.

गेल्या वर्षभरापासुन एका बाबाचा दरबार आनंदनगर येथे भरत असुन त्या बाबाकडे उपचारासाठी आपल्या आई वडिलांसह जाणारा प्रताप  चिंतावार रा.लखमापुर ता.माहुर जि.नांदेड या १८ वर्षीय युवकाने गावालगत असलेल्या पाणीपुरवठ्याच्या विहीरीत अचानक उडी घेवुन आत्महत्या केली.प्रताप हा कोण्या तरी अज्ञात आजाराने ग्रस्त होता त्यामुळे त्याला उपचाराकरिता आनंदनगर येथिल नितीनबाबा कडे घेवुन जात असताना वडिलांच्या हाताला झिडकारुन पळ काढला व सरळ विहीरीत उडी घेतली, विहीरीला भरपुर पाणी असल्यामुळे तो वर आलाच नाही त्याच्या आई वडिलांनी आरडा ओरड केल्यामुळे लोक धावुन आले.परंतु तोपर्यंत त्याचा पाण्यात बुडुन मृत्यु झाला.

सदर घटनेची तक्रार पोलिस पाटील सुनिल राठोड यांनी महागाव पोलिसांना दिली.यावरुन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवुन पोलिस कर्मचारी युवराज जाधव व गावातील धम्मशिल ठमके,प्रमोद पवार,संदिप राठोड यांच्या मदतीने दोन तासांच्या अथक परिश्रमाने मृतदेह बाहेर काढुन प्रेताचा पंचनामा करुन उत्तरीय शेवविच्छेदनासाठी सवना येथिल रुग्णालयात पाठविले.