“श्रीं”चा महापारायण सोहळा ऐतिहासिक ठरणार : आ.डॉ. श्री अनिल बोंडे 

0
466
Google search engine
Google search engine

संदीप बाजड / अमरावती :

 

२१ जानेवारी २०१८ रोजी अमरावतीला होणारा श्री. गजाजन विजय ग्रंथ महापारायण सोहळा हा ऐतिहासिक होणार, या सोहळ्याच्या निमित्ताने लोकांच्या एकजुटीचा प्रत्यय येईल असे उदगार मोर्शी – वरुड विधानसभा संघाचे आमदार डॉ.अनिल बोंडे यांनी काढले. दस्तूर नगर चौकातील श्री गजानन विजय ग्रंथ महापारायण सोहळ्याच्या संपर्क कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अमरावती महानगर पालीकाचे स्थायी समिती सभापती तुषार भारतीय हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ वैज्ञानिक विकास मंडळाचे सदस्य व नागपूर येथील निवासी कपिल चंद्रायन, मनपाच्या उपमहापौर सौ.संध्याताई टिकले, प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे, आयोजन समितीचे सचिव सुधीर वाकोडे, रविभाऊ देशमुख, अजय जगताप, राजेश बाहे, मनोज राऊत, दीपक यादव, महेंद्र राऊत महाराज, प्रमोद कराळे, विजय पुंडकर, जगदीश गुल्हाने, योगेश देवके, पांडे गुरुजी, हरेश्वर लोमटे, जयंत हरणे, यश देशमुख, यांच्यासह इतर मान्यवर व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 


याप्रसंगी श्री संत गजानन महाराजांची महाआरती करण्यात आली, यावेळी स्थानिक श्री संत गजानन महाराज भक्त परिवार महापारायण सेवा समिती सदस्यांनी मान्यवरांना श्रींची प्रतिमा देऊन सन्मानपुर्वक सत्कार करण्यात आला. त्यानंतर झालेल्या सभेत श्री गजानन विजय ग्रंथ महापारायण सोहळ्याची सविस्तर माहिती आयोजन समितीचे सदस्य मनोज राऊत यांनी सांगितली. श्रींचा सोहळा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री आयोजन समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.