वाठोडा शुक्लेश्वर येथील बौद्धविहाररात संविधान दिन उत्साहात

0
1251
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी/गजानन खोपे

वाठोडा शुक्लेश्वर :-

भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील आनंद नगर परिसरातील बौद्धविहार

मध्ये संविधान दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, डॉ बाबासाहेब आबेडकर यांच्या प्रतिमेचे हार अर्पण मान्यवराच्या हस्ते करण्यात आले ,तसेच गावामधुन रँली काढण्यात आली,भारतीय संविधान सर्वच्या हक्का साठी महान आहे,असे नारे देण्यात आले, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष्या रुपाली मव्हाणे ,कार्यक्रमाचे संचालन दिपक मोहोड, यांनी केले, उपासीका आणि बाल बालीका , कौशल्याबाई मकेश्वर, गोपाल जंवजाळ,अविनाश मकेश्वर ,तसेच बौद्धबांधव मोठ्या संख्येने उपस्थितीत होते,