*राजे धर्मराव कला व वाणिज्य महाविद्यालयात म. फुले स्मृती दिन संपन्न*

0
528
Google search engine
Google search engine

गडचिरोली :-

मुलचेरा (दि. २८/११/२०१७)
स्थानिक राजे धर्मराव कला व वाणिज्य महाविद्यालय येथे म. ज्योतिबा फुले यांचा १२६ वा स्मृती दिन संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रकाश मेश्राम हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. सुनंदा पाल, प्रा. डॉ. राजेशकुमार सूर, प्रा. डॉ. हिराचंद वेस्कडे, प्रा. अशोक धोटे, प्रा. डॉ. हेमंत गजाडीवार हे होते. याप्रसंगी डॉ. सूर तथा डॉ. वेस्कडे यांचे यथोचित भाषणे झालीत. म. फुले यांचे विचार व कार्य भारतीय समाजासाठी बहूमोल भेट आहे. त्यांचे विचार आजही अनुषांगिक असेच आहेत, असे वक्त्यांनी विचार व्यक्त केले. सोबतच प्राचार्य डॉ. मेश्राम यांनी म. फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांनी म. फुले यांचा सखोल अभ्यास करायला हवा, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. अरुण लाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी , नरेंद्र मत्ते, मनोज कुंभारे, आनंद तावाडे, राजू मडावी, सुरेश मुरमुरवार, मारोती खिरटकर, कविता उईके यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.