जि. प. शाळेत संविधान दिवस साजरा

0
539
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद  खान ) –

 

स्थानिक जि. प. हायस्कुलमध्ये सोमवारी संविधान दिवस साजरा करण्यात आला. संविधान दिनानिमित्य आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे पर्यवेक्षक श्री. खडसे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणुन श्रीमती लांजेवार, श्री. कडु उपस्थित होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन केले.
यानंतर अध्यक्षीय भाषणातुन श्री. खडसे यांनी अथक परीश्रमातुन डॉ. आंबेडकरांनी संविधानाची निर्मीती कशी केली? हे पटवुन देऊन संविधानाचे महत्व व वैशिष्टे विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाचे संचलन कु. खुशबु मेश्राम तर आभार प्रदर्शन कु. गौरी सोरगिवकर या विद्यार्थीनीने केले. कार्यक्रमाला शिक्षक, कर्मचारीवृंद, विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते..