ढोले डॉस्पीटलमध्ये मोफत रोग निदान तपासणी शिबीर संपन्न ‘द फेस’ हेड, नेक, फेस, कॅन्सर हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी केली तपासणी

0
512
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) –

कर्करोग हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवणारा रोग आहे. भारतामध्ये दरवर्षी जवळपास १ लाख ४० हजार कर्करोगाचे रूग्ण आढळत आहे व दर तासाला कित्येक जण कर्करोगाने मृत्युमुखी पडतात. तसेच चेहरा आणि दातांच्या विकृतींचे प्रमाणसुध्दा अधिक आहे. याच बाबीचे दखल घेऊन शहरातील सुप्रसिध्द डॉक्टर क्रांतीसागर पांडुरंग ढोले यांनी आपल्या दवाखान्यात अमरावती येथील ‘द फेस’ हेड, नेक, फेस, कॅन्सर हॉस्पीटलच्या चमुंच्या अथक परीश्रमाने मोफत रोग निदान तपासणी शिबीर आयोजित केले होते.

 


स्थानिक ढोले हॉस्पीटलमध्ये आयोजित रोग निदान शिबीरामध्ये चेहरा, गळा, मान व तोंडाचा कर्करोग, गुटखा, सुपारी संबंधी तोंडाचे आजार, ट्युमर आणि गाठी, इन्फेक्शन, सुज,  चेहरा, डोके व जबड्याचे फ्रॅक्चर, अॅक्सीडेंट, जॉईंट संबंधी समस्या, दुभंगलेले ओठ, टाळु आणि चेहऱ्यासाठी शस्त्रक्रिया, हेअर ट्रान्सप्लांट, वेडेवाकडे दात सरळ करणे, प्रौढांसाठी स्माईल करेक्शन, दातांचे प्रत्यारोपन, ब्रेसेस आणि क्लीप्स आदींची या रोग निदान तपासणी शिबीरात मोफत तपासणी करण्यात आली. या शिबीरामध्ये अमरावती येथील ‘द फेस’ हेड, नेक, फेस, कॅन्सर हॉस्पीटलचे हेड, नेक, कॅन्सर सर्जन डॉ. रणजित मांडवे, कॉस्मेटीक ऑर्थोडॉन्टीक्स डॉ. स्वप्ना मांडवे यांनी जवळपास ८० रूग्णांनी तपासणी केली व मार्गदर्शन केले. सदर शिबीर हे डॉ. क्रांतीसागर पांडुरंग ढोले व डॉ. अनुया क्रांतीसागर ढोले यांच्या विशेष सहकार्याने संपन्न झाले. या शिबीरामध्ये ‘द फेस’ हेड, नेक, फेस, कॅन्सर हॉस्पीटलची चमु व ढोले हॉस्पीटलाच्या चमुंनी अथक परीश्रम घेतले.