तुर पिकावरील शेंगा पोखळणाऱ्या अळीचे वेळीच नियंत्रण करा

0
752
Google search engine
Google search engine

भंडारा – 

 

भंडारा उपविभागात तालुका भंडारा, तुमसर, मोहाडी व पवनी येथे तुर पिकावर शेंगा पोखळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव क्रॉपसॅप सर्वेक्षणात आढळून आलेला आहे. ही अळी तुरीच्या शेंगा व फुले खाऊन पिकाचे नुकसान करते. पूर्ण वाढ झालेली अळी 30 ते40 मी.मी. लांब पोपटी रंगाची असून पाठीवर तुटक करडया रेषा असतात. मोठया अळया शेंगांना छिद्र करुन आतील दाणे पोखरुन खातात.
सध्याच्या परिस्थिततीत सदर अळीचे प्रमाण आर्थिक नुकसान सेंकत पातळी पर्यंत असून वेळीच नियंत्रण केल्यास पिकाचे नुकसान टाळणे शक्य आहे. करीता शेतकऱ्यांनी या प्रमाणे शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण करावे. तुर पिक कळी व फुलोरा अवस्थेत असतांना पक्षी थांबे 50 हेक्टर उभारावे व कामगंध सापळे 5 हेक्टर लावावे. तसेच 5 टक्के निंबाळे अर्काची फवारणी करावी. तुर पिक फुलोरा व शेंगा अवस्थेत असतांना स्पिनोसाड (45) 2.5 मि.ली. किंवा इमामेक्टीन बेन्झोएट(5) 4 ग्रॅम किंवा क्लोराट्रानिलीपोल (20) 3 मि.ली. प्रती 10 लिटर पाण्यातून फवारावे, असे आवाहन उपविभागीन कृषि अधिकारी एस.पी. लोखंडे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.