कढोली येथे बस आणि ट्रेलर अपघातात बसचालकासह एका वृद्धाचा  जागेवरच मृत्यू – अनेक जखमी

0
576
Google search engine
Google search engine

नागपूर :–

मौदा पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या कढोली येथे बस आणि ट्रेलरचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात बस चालकासह चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे त्यात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

जखमींना तातडीने नागपूर येथील मेयो हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहेत.अपघात इतका भीषण आहे की, बसच्या कॅबिनचा अक्षरश: चुराडा झाला आहे.ही बस भंडाराकडून नागपूरकडे जात असताना अपघात घडल्याची शक्यता वर्तविली जात आहे.