हिंगोली येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड !

0
732
Google search engine
Google search engine

हिंगोली – गुजरात विधानसभा निवडणूक प्रचाराच्या वेळी काँग्रेसचे प्रवक्ते खासदार राजीव सातव यांना पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप करत येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या नगराध्यक्षांचे कार्यालय आणि शासकीय विश्रामगृहात घुसून तोडफोड केली, तर काही तरुणांनी राज्य परिवहनाच्या बसगाड्यांवर दगडफेक केली.

१. काँग्रेसचे नेते हिंगोलीचे खासदार राजीव सातव हे गुजरातमध्ये प्रचारासाठी गेले होते. २ डिसेंबरला मध्यरात्री राजकोटमध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीच्या वेळी पोलिसांनी लाठीमार केला.

२. या लाठीमाराच्या वेळी खासदार सातव यांनाही गुजरात पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यानंतर पोलिसांनी अटक करून त्यांची जामिनावर सुटका केली.

३. या घटनेमुळे येथील शासकीय विश्रामगृहाची २ डिसेंबरच्या मध्यरात्री तोडफोड करण्यात आली. तसेच आज सकाळी औंढा नागनाथ येथे काँग्रेस कार्यकत्यांनी भाजपच्या नगराध्यक्षा दीपाली पाटील यांच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली आणि रस्त्यावर प्रधानमंत्री मोदी यांचा पुतळा जाळला.

४. आज सकाळी काही तरुणांनी राज्य परिवहनच्या बसगाडीवर दगडफेक करून नुकसान केले.