देहली येथे भारतीश्रीपीठम्कडून सनातन संस्थेचा सन्मान

0
620
Google search engine
Google search engine

नवी देहली – गीता जयंतीच्या निमित्ताने भारतीश्रीपीठम्च्या वतीने १९ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत देेहली येथील सर्वेश्‍वर मंदिर भारतीश्रीपीठम् या ठिकाणी गीता ज्ञान यज्ञ साधन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये उमामहेश्‍वरा सेवा ट्रस्ट शिवमोग्गा, कर्नाटक चे प्रमुख श्री. सी.एम्.एन्. शास्त्री यांच्या हस्ते शाल आणि तुळशीचे रोपटे देऊन सनातन संस्थेला सन्मानित करण्यात आले. हा सन्मान संस्थेच्या वतीने साधक श्री. सुदर्शन गुप्ता यांनी स्वीकारला.

या वेळी भारतीश्रीपीठम् चे संस्थापक अध्यक्ष स्वामी सर्वानंद सरस्वती वेदान्ताचार्य म्हणाले, सनातन संस्थेचे राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य देशभरात चालू आहे. संस्थेचे साधक तन, मन आणि धनाच्या माध्यमातून साधना तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात मग्न आहेत, तसेच यशस्वी होत आहेत.

क्षणचित्र : श्री. गुप्ता यांचा सत्कार झाल्यावर इतर मान्यवर स्वत:हून पुढे आले आणि त्यांनी श्री. गुप्ता यांच्या समवेत एकत्रित छायाचित्र काढून घेतले.