वाठोडा शुक्लेश्वर येथील गावातील मुख्य रस्त्यांची दयनीय अवस्था  – स्थानिक लोकप्रतिनिधी झोपेत

0
793
Google search engine
Google search engine

तालुका /प्रतिनिधी :- गजानन खोपे

भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील
बस स्टॉप ते ग्रामपंचायत चौक सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या मधोमध कोल्हापूरी पँटर्न चेकर बसविण्यात आलेल्या होते,रस्त्यावरील पुर्ण पनेने गावातील मुख्य रस्तावरील मोठे मोठे खडे पडल्याने त्या रस्त्यावरून , ये -जा करणाऱ्या वाहन चालकांना स्वतः चा जीव मुठीत घेऊन ये-जा करावे लागतो.

तसेच तरीही गावातील वार्ड क्रं १ मध्ये जाणाऱ्या मुजोबा कॉलनीतील रस्त्याची पुर्ण दैनियअवस्था झाली.असुन रस्ता पावसाने चिखल साचल्यामुळे वाट कशी कढावी असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.तसेच वार्ड क्रं १मध्ये गेल्या कित्येक वर्ष पासुन येथील वस्ती मध्ये विजेचे खांब्याची मागणी सुध्दा ग्रामपंचायत ला अनेक वेळी निवेदन सदर करण्यात आले,मात्र सरपंच आणि सदस्य यांच्या घरा सोमरील चौकात भरदिवस चालू राहतात, तर एकीकडे खांब्यावर दोन लाईट बसविण्यात तर गावातील अनेक भागात एकही लाईट बसविण्यात आला नाही.

लाईट टँक्स भरत नाही काही का अस सवाल परिसरातील नागरिकांनी उपस्थितीत केला, मार्गावर चिखल साचत असुन येथे राहणाऱ्या नागरिकांना ये-जा करण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत आहे.अनेकदा ग्राममपंचायत व जिल्हापरिषदेकडे या संदर्भत तक्रारी सुध्दा देऊन तोडगा काढण्यात आला नाही सध्या पावसाचे दिवस असल्याने रस्त्यात सर्वत्र चिखल व पाणी दिसून येत आहे.

तसेच या वार्ड मध्ये सांडपाणी जाण्याकरिता नाल्या नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकाच्या आरोग्या धोका होण्याची शक्याता निर्माण झाली आहे.गेल्या दहा वर्ष पासुन परिसरातील रस्ता देण्याच्या मागणीसाठी सतत पाठपुरवा करीत असतान या संदर्भात ग्रामपंचायत सरपंच ,नगरसेवक यांचे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.