रक्षा जालानची रिसर्च कॉन्फरन्ससाठी निवड मार्च महिन्यात फ्रान्सला जाणार

0
577
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )

शहरातील संजय जालान यांची कन्या कु. रक्षा जालान हिची ‘युरोपीयन कॉन्फरन्स ऑन रिट्रायवल’ या प्रसिध्द रिसर्च कॉन्फरन्स साठी निवड झाली आहे. ही कॉन्फरन्स फ्रान्स, युरोप मध्ये मार्च महिन्यात होणार असुन रक्षा आपले संशोधन सादर करणार आहे. रक्षा जालान ने मास्टर ऑफ सायंसची कॉम्प्युटर सायंसमध्ये पदवी नुकतीच पुर्ण केली. रक्षाने संशोधनामध्ये इंटरनेटवर विचारलेल्या आरोग्याविषयी प्रश्नांचे व्यवस्थित वर्गीकरण करून त्याचे उत्तर शोधायची नवीन पध्दत तयार केली आहे.
रक्षाची रिसर्च कॉन्फरन्स करिता फ्रान्सला जाण्यासाठी निवड झाल्याबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.