मनातली भीती काढा आनंदासाठी काम करा – प्रधान सचिव नंदकुमार. ><><><राज्यस्तरीय विषयसाधन व्यक्ती कार्यशाळा

0
1027
Google search engine
Google search engine

अमरावती :– इतक्या सभा झाल्यात, कार्यशाळा झाल्यात पण आज कुठून सुरवात करायची कळतं नाही, तुमचे एवढ्या मोठया प्रमाणात एकत्रित येण्यामागचे दुहेरी उद्देश मला माहीत आहे. तेव्हा मनातील भीती काढा व आनंदासाठी काम करा, असा संदेश शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी विषय साधन व्यक्ती यांना दिला.
विषयसाधन व्यक्ती प्रदेश महासंघ तर्फे विषयसाधन व्यक्ती यांच्या साठी राज्यस्तरीय शैक्षणिक कार्यशाळेचे आयोजन येथील संगीतसुर्य केशव भोसले सभागृहात करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत गेल्या 10 वर्षापासून शिक्षण क्षेत्रात करार पद्धतीने काम करणाऱ्या विषय साधन व्यक्ती यांना शैक्षणिक मार्गदर्शन मिळावे यासाठी साधनव्यक्ती राज्यसंघटनेने याचे आयोजन केले होते. यावेळी पुढे बोलतांना नंदकुमार म्हणाले की, एखादा कलावंत एखाद्या चित्रपटासाठी मानधन घेतो तेव्हा तो शंभर टक्के काम देतो तेव्हा आपण हि या शिक्षण क्षेत्रातील कलावंत समजावं. आज न उद्या कायमच्या नोकरीचा प्रश्न मार्गी निघेलच पण आज ज्या चिमुकल्यांच्या भविष्यासाठी आपण काम करीत आहो त्यांचे भविष्य खराब होऊ नये याची जबाबदारी आपण घेऊया. शिक्षण क्षेत्रातील सर्वात तरुण वयोगट म्हणून मी तुमच्या कडे पाहत आहो मनावरील सर्व मरगळ झटकून कामला लागा, मूल का शिकत नाही याचा शोध घ्या. स्वतःचे अस्तित्व निर्माण करा प्रत्येक शिक्षक तुमच्या मताचा आदर करेल. आज छोटा दोस्त या पुस्तकाच्या निमित्ताने विषयसाधन व्यक्ती चे कार्य समोर आले आहे, असे अनेक कामे आपले लोक करीत असतील त्याचा वेग वाढवा. मुलांना वाचता आले पाहिजे त्यासाठी काम करा. सध्या अनेक प्रशिक्षण सुरु आहे तेव्हा प्रत्येक प्रशिक्षण हे दर्जेदार व परिणामासाठी व्हायला पाहिजे, असे सांगत बदललेल्या जमान्यानुसार बदल करा हे सांगतांना त्यांनी गांधीजींनी एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करा अस का म्हटलं याचा सकारात्मक अर्थ हि समजून सांगितले. वाद करीत बसू नका, राग आला तर सर्वात पहिले मोबाईल दूर ठेवा म्हणजे वाद वाढणार नाही हे हि आवर्जून सांगितले.

 

 


मी नित्य आनंदी राहील सुखात राहील हि पहिली जबाबदारी स्वीकारा. आपल्या वर्गातील शाळेतील विदयार्थी वाचायला लागला तर आपल्याला आनंद होतो तो आनंद मिळवा असे मत नंदकुमार यांनी व्यक्त केले. या कार्यशाळेचे वैशिट्य म्हणजे नंदकुमार साहेब यांनी कुठलाही रोष व्यक्त न करता हसत हसत मार्गदर्शन केले. त्यांच्या भाषणात अनेक वेळा सभागृह खदखदून हसले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात छोटे दोस्त या पुस्तिकेच्या लेखिका व शिक्षिका संगीता पवार यांची प्रकट मुलाखत विषयसाधनव्यक्ती मनीष जगताप यांनी घेतली त्यातून विषय साधन व्यक्ती चे काम कसे प्रभावी होत आहे हे सांगण्यात आले. यावेळी विचारमंचावर विद्या प्राधिकरण चे संचालक येथील डॉ सुनील मगर , उपसंचालक सी आर राठोड, अमरावती जी प चे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी, शिक्षण सल्लागार सिद्धेश वाडकर, डीआयसीपीडी अमरावतीचे प्राचार्य रवींद्र आंबेकर
शिक्षणाधिकारी आर बी तुरणकर, माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी नीलिमा टाके, शाम मक्रमपुरे, जितेंद्र राठी, रत्नमाला खडके, आदी उपस्थित होते, कार्यक्रमाला राज्य भरातील 2 हजारावर कर्मचारी उपस्थित होते, याच वेळी विषय साधन व्यक्ती यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे, तसेच बोलीभाषेच्या पुस्तकाचे प्रकाशन हि अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले, अतिशय भव्य स्वरूपात झालेले ह्या कार्यक्रमाचे संचालन विषय साधनव्यक्ती राजेश नाईक, गायकवाड प्रास्ताविक प्रकाश आंबेकर, तर आभार प्रदर्शन विवेक राऊत, संघटनेचे राज्यध्यक्ष परमेश्वर काकडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमरावती जिल्हा साधन व्यक्ती संघटना व राज्य संघटनेच्या पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.