सांगोले सूतगिरणीच्या कर्जपुरवठ्याबाबत परवानगी देणार – मुख्यमंत्री

0
585
Google search engine
Google search engine

आ. गणपतराव देशमुख यांच्या कडून मुख्यमंत्र्यांचे आभार

नागपूर. ( शाहरुख मुलाणी ) – सोलापूर जिल्ह्यातील सांगोले शेतकरी सहकारी सूतगिरणीला कर्जपुरवठ्याबाबत पंढरपूर को-ऑपरेटिव्ह अर्बन सोसायटीला शासनाकडून परवानगी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सूतगिरणीच्या प्रश्नांबाबत विधानमंडळाच्या मंत्रीपरिषद सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

दुष्काळी भागातील ही सूतगिरणी सातत्यपूर्णरीत्या चांगली चालत आली आहे. या ठिकाणी ९०० हून अधिक कामगार आहेत. तथापि, अलीकडे संचित तोट्यामुळे सूतगिरणीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे १२ कोटी कर्जाची मागणी बँकेकडे केली आहे. या कर्जपुरवठ्यासाठी शासनाची परवानगी आवश्यक आहे. ती मिळावी, अशी मागणी शेकाप आमदार गणपतराव देशमुख यांनी यावेळी केली. त्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या सूतगिरणीला कर्जपुरवठा करण्याबाबत सदर बँकेला शासनाकडून आवश्यक परवानगी दिली जाईल. बँक विहित पद्धतीने नियमानुसार सूतगिरणीला कर्जपुरवठा करु शकेल. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल आमदार देशमुख यांनी त्यांचे आभार मानले. या बैठकीस सहकार, वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख, आ. गणपतराव देशमुख, आ. जयंत पाटील, मुख्य सचिव सुमित मल्लिक, अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, वस्त्रोद्योग अपर मुख्य सचिव उज्ज्वल उके आदी उपस्थित होते.


सूतगिरणी कर्जासंदर्भात पंढरपूर बँके कडे पत्र दिले असता. सहकारी ज्या संस्था आहेत त्यांना सभासद करून घेऊन कर्ज देऊ नये असे तरेचे पत्र सहकार विभागाकडून पाठविण्यात आले होते. म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांकडे हा प्रश्न नेला असता त्यांनी बैठक बोलावली. मुख्यमंत्र्यांनी सूतगिरणीला कसे कर्ज देता येईल या दृष्टीने सहकार विभागाने परवानगी द्यावी, या संदर्भातला निर्णय त्यांनी दिला. – श्री गणपतराव देशमुख