सोनाळा येथील  पिस्तुल प्रकरनात सखोल चौकशी करण्याबाबत जेष्ठ पत्रकार भाऊ भोजने यांचे नागपूर अधिवेशनासमोर धरणे आंदोलन

0
711
Google search engine
Google search engine

-दयालसिंग चव्हाण -बुलडाणा

बुलडाणा :- संग्रामपुर तालुक्यातील सोनाळा पो स्टे चे तत्कालीन ठाणेदार सचिनसिंह परदेशी ,पोलिस उपनिरीक्षक बडगुजर , पो.ना.शाम कपले,पो.ना.गजानन तायडे व इतर यांनी वसाळी येथील दिलीप मुझालदा यास दोन पिस्तोल व दोन कारतुस देऊन खोटया प्रकरणातुन फसवून गुन्हे दाखल केलेबाबत आज दि.19 डिसेंबर रोजी नागपूर येथे सामाजिक कार्यकर्ता तसेच जेष्ठ पत्रकार भाऊ भोजने यांचे या प्रकनाबाबत सखोल चौकशी करण्यात यावी याकरिता अधिवेशनासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे .

सविस्तर असे की ,जेष्ठ़ पत्रकार भाऊ भोजने यांनी जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा यांना संसद भवनासमोर हिवाळी अधिवेशन सुरु असतांना 18 डिसेंबर पासुन आमरण उपोषनाचे निवेदन सादर केले होते. मात्र आंदोलन नागपुर येथे गेले असता तेथील पोलिस कर्मचाऱ्यांनी धरणेआंदोलन करण्याची परवानगी दिली. त्यापरवानगीनुसार आज दिनांक 19 डिसेंबर पासुन धरणे आंदोलनास सुरुवात केली. सदर निवेदनात नमुद आहे दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सोनाळा पोलिस स्टेशन तत्कालीन ठाणेदार सचिनसिंह परदेशी ,पोलिस उपनिरीक्षक बडगुजर , पो.ना.शाम कपले,पो.ना.गजानन तायडे आणि सोनाळा येथील प्रकाश बोदडे व वसाळी येथील राजु किसन राऊत यांनी कटकारस्थान करुन वसाळी येथील दिलीप मुझालदा याला दोन पिस्तोल व दोन कारतुस देऊन केवळ आपली पदोन्नती करण्यासाठी खोटया प्रकरणातुन फसवून गुन्हे दाखल केले याबाबत संबंधीत अधिकाऱ्याकडे आरोपी दिलीप मुझालदा व भाऊ भोजने असे अनेक तक्रारी केल्या तसेच संग्रामुपर तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. खामगांव येथील अप्पर पोलिस अधिक्षक शाम घुगे साहेबांनी पत्राद्वारे लेखी दिले की याप्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे असे लेखी दिले परंतु 5 महिन्याचा कालावधी उलटुन गेल्यावरही कोणतेही कार्यवाही न झाल्यामुळे वरीष्ठ़ अधिकारी हयांनी ठाणेदार परदेशी व इतर कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचे स्पष्ठ़ होते , या प्रकरणातील सखोल चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी जेष्ठ़ पत्रकार भाऊ भोजने यांनी नागपुर येथील अधिवेशनासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे.