साऊर येथे संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ -२५ डिसेंबरला महाप्रसाद

0
723
Google search engine
Google search engine

टाकरखेडा शंभू / संतोष शेंडे –

कर्मयोगी संत गाडगेबाबा पुण्यतिथी,महर्षी डॉ.उपाख्य पंजाबराव देशमुख जयंती व कै.बापुराव बोंडे स्मृती या त्रिमुर्तीचा महोत्सव १८ डिसेंबर पासून प्रारंभ झाला असून २४ डिसेंबर ला या महोत्सवाचा समारोप होणार आहे.२५ डिसेंबरला महोत्सव निमित्य आयोजीत श्रीमद भागवत सप्ताहाचा समारोप होणार आहे त्यानंतर भव्य महाप्रसाद होणार आहे.

दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील भातकुली तालुक्यातील साऊर येथे १८ डिसेंबर पासुन श्रीमद भागवत सप्ताहाला प्रारंभ करण्यात आला.२५ डिसेंबर पर्यत चालणा-या या महोत्सवाला अंतर्गत दैनंदिन कार्यक्रमामध्ये सकाळी सामुहिक ध्यान व रामधून नंतर सकाळी ९ ते १२ दरम्यान श्रीमद भागवत सप्ताह, दुपारी ३ ते ६ दरम्यान श्रीमद भागवतानंतर ६:३० ते ७:०० दरम्यान सामुहिक प्रार्थना,७ ते ८ दरम्यान हरिपाठ तसेच सप्ताहाअंतर्गत १८ डिसेंबरला भजन संध्या अपंग विद्यालय अमरावती यांचा कार्यक्रम, १९ डिसेंबरला दु.१ वाजता प्रा.अरुणराव देशमुख यांचे व्याख्यान व रात्री ८ वा.कु.ऋतुजाताई वर्धे व कु.प्रणालीताई पकडे(नांदगाव खंडे) यांचे चक्रीकिर्तन,२० डिसें.ला रात्री ८ वा.ह.भ.प.शिवहरी महाराज गावंडे मोचर्डा यांचे किर्तन ,२१ डिसें.ला दु.१२ ते ३ इंजी.जिवन गावंडे पाटील यांचे व्याख्यान व रात्री ८ वा.कु.क्रांती मंगेश काळे साखरवाडी यांचे राष्ट्रिय किर्तन,२२ डिसें.ला रात्री ८ वा.ह.भ.प.विजय चारथळ महाराज सातुर्णा यांचे पंचरंगी किर्तन ,२३ डिसें.ला दु.१ वा.डॉ.संगिताताई रिठे यांचे व्याख्यान व रक्तदान शिबीर व रात्री ८ वा.ह.भ.प.संतोष महाराज जाधव,माणिकवाडा(ता.नेर)यांचे पंचरंगी किर्तन,२४ डिसें.ला दु.१२ वा.माहेरवासिनी कार्यक्रम (गावातील लेकींचा सत्कार) व रात्री ८ वा.ह.भ.प.सोपान महाराज काळबांडे यांचे वारकरी किर्तन व भागवत सप्ताहाची समाप्ती होणार आहे.
तर २५ डिसें.ला सकाळी ८ वा.गावातून भव्य शोभायात्रा निघणार आहे.दु.१ वा.ह.भ.प.संदिप महाराज गिरी यांच्या काल्याच्या किर्तनानंतर दु.४ वा.महाप्रसादाला सुरवात होणार आहे.याचा लाभ दादा भामोदकर कृषी विद्यालय साऊर येथे भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन आयोजन समितीने केले