*जि.प.शाळा नावली येथे अपुर्व विज्ञान मेळावा संपन्न*

0
846
Google search engine
Google search engine

(रुपेश बाजड,) रिसोड :-

राज्यातील जिल्हा परिषद शाळांना पटसंख्येअभावी उतरती कळा लागलेली असतानाच नावली येथील जिल्हा परिषद शाळेबाहेर हाऊसफुल्ल प्रवेशाचे बोर्ड लागले होते. जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश नकोच असा बव्हंशी पालकांचा मानस तयार झाला असतानाच नावलीच्या शाळेने स्वबळावर आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. जिल्हा परिषदेची शाळाही आदर्श ठरू शकते हे सिद्ध केले आहे. नावली येथील जिल्हा परिषद शाळा संपूर्ण महाराष्ट्रात ३६५ दिवस चालणारी शाळा.नावली येथील गावातील लोक या शाळेला आत्मा समजतात.या शाळेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातुन शिक्षक, समाजसेवक बहुतांश मंडळी शाळा बघण्यासाठी येत आहेत.त्यातच आज दिनांक १९ डिसेंबर रोजी पंजाबराव खराटे (गटशिक्षणाधिकारी रिसोड) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद शाळा नावली येथे विज्ञान प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती.२९ प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केले होते.प्रसंगी शिक्षक यांनी मोलाचं मार्गदर्शन केले.