विद्यापीठाचा पर्यावरण व संत गाडगे बाबा सामाजिक कार्य पुरस्कार प्रदान >< पुरस्कारकत्र्यांचा सामाजिक वारसा सर्वांनी पुढे न्यावा - कुलगुरु

0
792
Google search engine
Google search engine

अमरावती –
विद्यापीठाच्यावतीने संस्थागटात श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, देऊळगांव राजा, जिल्हा बुलढाणाचे प्राचार्य डॉ. गजानन जाधव यांना, तर व्यक्ती गटात शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, कोथळी (बु) ता. बार्शिटाकळी, जि. अकोला येथील माध्यमिक शिक्षक श्री विठ्ठल हरिभाऊ मिरगे यांना पर्यावरण पुरस्कार तसेच कै. नागोरावजी जयरामजी मेटकर स्मृति प्रित्यर्थ दिला जाणारा श्री संत गाडगे बाबा सामाजिक कार्य पुरस्कार श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट, मुंबईचे व्यवस्थापक श्री एकनाथ जगन्नाथ ठाकूर यांना कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर यांचे हस्ते ससन्मान प्रदान करण्यात आला. संस्थागटात पंधराहजार रुपये रोख आणि व्यक्तिगटात दहाहजार रुपये रोख तसेच शॉल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र आणि सामाजिक पुरस्कारांतर्गत दहाहजार रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरु डॉ. राजेश जयपूरकर, प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ. रविंद्र कोल्हे, कुलसचिव डॉ. अजय देशमुख, पर्यावरण पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ.डी.एन. शिंगाडे, दानदात्यांचे प्रतिनिधी डॉ.व्ही.एम. मेटकर, सत्कारमूर्ती प्राचार्य डॉ. गजानन जाधव, श्री विठ्ठल हरिभाऊ मिरगे, श्री एकनाथ जगन्नाथ ठाकूर, अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. दिलीप काळे, डॉ.व्ही.आर. देशमुख, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर, उद्यान अधीक्षक श्री अनिल घोम उपस्थित होते.
मार्गदर्शन करतांना कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर म्हणाले, योग्य व्यक्तींची निवड पुरस्कार समितीने केलेली आहे. त्यांच्या रुपाने समाजसेवा करणारी माणसे समाजाला मिळाली असून समाज त्यासाठी धन्यतेस पात्र आहे. समाजसेवेचे व्रत डोळयासमोर ठेवून पुरस्कार प्राप्तकर्ते काम करत गेले आणि मोठी कामे त्यांच्या हातून झाली. त्यांच्या कार्याचा आदर्श म्हणून विद्यापीठाने त्यांना ससन्मानित केले आहे. समाजाला अशा सन्मानित व्यक्तींपासून प्रेरणा मिळावी आणि त्यांच्या कार्यातून समाज घडावा, अशी अपेक्षा त्यामधून आहे, असे सांगून कुलगुरुंनी डॉ. बाबा आमटे, डॉ. रविंद्र कोल्हे यांच्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला.
पुढे म्हणाले, समाजासाठी संपूर्ण आयुष्य झिजविण्याचा कर्तृत्ववान मंडळीच्या जीवन व कार्यापासून आपल्याला सामाजिक जीवन जगण्याची दृष्टी मिळत असते. समाज त्या माध्यमातून घडत असतो. त्यांचा सामाजिक कार्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा, असे आवाहन कुलगुरुंनी केले. मेळघाटात आदिवासी संशोधन केंद्र शासनाकडून मंजूर होत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
प्रमुख अतिथी म्हणून डॉ. रविंद्र कोल्हे म्हणाले, मेळघाटातील आदिवासींनी निसर्ग जपला आहे. मेळघाटात राहत असल्यामुळे मेळघाटाने मला जगण्याची उर्मी दिली, समृद्ध बनविले. सुरुवातीला त्या ठिकाणी कुपोषित बालकांची फार मोठी समस्या होती. त्यावर संशोधन करुन सादर केलेल्या प्रबंधात मांडलेल्या निष्कर्षाची दखल मा.उच्च न्यायालयाने घेतली आणि त्यातील मार्गदर्शक तत्वाचे पालन करण्यासाठी शासनाला आदेश दिलेत. संशोधन हे समाजोपयोगी व्हावं. माझा प्रबंध मेळघाट पॅटर्न झाला याचा सार्थ अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. गाडगे बाबांनी अनेकांना जगण्याची उर्मी दिली. प्रदुषणाची मोठी समस्या देशात निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वांना शुद्ध हवा, पाणी मिळण्यासाठी सर्व नागरिकांनी जास्तीतजास्त वृक्ष लावून आपल्या देशाला हरित देश बनवावं, असे आवाहन डॉ. कोल्हे यांनी यावेळी केले.

पर्यावरण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, देऊळगांव राजा, जिल्हा बुलढाणाचे प्राचार्य डॉ. गजानन जाधव, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, कोथळी (बु) ता. बार्शिटाकळी, जि. अकोला येथील माध्यमिक शिक्षक श्री विठ्ठल हरिभाऊ मिरगे यांनी तसेच श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट, मुंबईचे व्यवस्थापक श्री एकनाथ जगन्नाथ ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दानदात्यांचे प्रतिनिधी डॉ.व्ही.एम. मेटकर यांनी सांगितले, माजी आमदार कै. बबनदादा मेटकर यांनी विद्यापीठाला दिलेला तीन लक्ष रुपयांचा दाननिधी दिला. त्यावरील व्याजातून दरवर्षी माझे आजोबा कै. ना.ज. मेटकर स्मृति प्रित्यर्थ श्री संत गाडगे बाबा सामाजिक कार्य पुरस्कार दिल्या जातो, अशी माहिती देवून श्री ठाकूर यांच्या समाजकार्याची माहिती दिली. पर्यावरण पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ.डी.एन. शिंगाडे यांनी पर्यावरण पुरस्कार प्राप्तकत्र्यांनी पर्यावरणासाठी केलेल्या कार्याची सविस्तर माहिती दिली.

विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते श्री संत गाडगे बाबा, कै. बबनदादा मेटकर व कै. नागोरावजी मेटकर यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पार्पण, दीपप्रज्वलन व वृक्षतरुपूजन करण्यात आले. वृक्ष देवून कुलसचिव डॉ. अजय देशमुख व उद्यान अधीक्षक श्री अनिल घोम यांनी पाहूण्यांचे स्वागत केले. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय कुलसचिवांनी करुन दिला. कुलगुरुंनी यावेळी शॉल, श्रीफळ देवून डॉ. रविंद्र कोल्हे यांचा विद्यापीठाच्यावतीने सत्कार करुन आजीवन, अध्ययन व विस्तार विभागाद्वारा प्रकाशित वार्षिक अहवालाचे विमोचन केले. संचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी तर आभार उद्यान अधीक्षक श्री अनिल घोम यांनी मानले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यापीठ मुख्य प्रवेशद्वारासमोरील श्री संत गाडगे बाबांच्या संदेश शिल्पाला भेट देवून कुलगुरुंसह सर्व मान्यवरांनी पुष्पार्पण करुन अभिवादन केले. राष्ट्रगीताने सांगता झालेल्या कार्यक्रमाला माजी प्र-कुलगुरु डॉ. जयकिरण तिडके, डॉ.व्ही.एस. जामोदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.जे.डी. वडते, वित्त व लेखा अधिकारी डॉ. शशीकांत आस्वले, एल.एल. चे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, संचालक डॉ. अविनाश असनारे, डॉ. रविंद्र कडू, श्री वरणगावंकर, डॉ.बी.जी. खोब्राागडे, प्राचार्य हावरे, डॉ. अरविंद देशमुख, डॉ. राजेंद्र उमेकर, अॅड. यदुराज मेटकर, विभागप्रमुख डॉ. आनंद अस्वार, डॉ. मनोज तायडे, डॉ. प्रसाद वाडेगांवकर, प्राधिकारिणींचे माजी व आजी सदस्य, श्री प्रशांत देशमुख, श्रीमती उषाताई वेरुळकर, यांचेसह विद्यापीठाचे अधिकारी, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक व पत्रकार मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.