मुकुंदनगर उपनगरातील वार्ड क्रमांक 10 मध्ये सिमेंट कॉंक्रिटीकरण कामाला सुरवात

0
698
Google search engine
Google search engine

अहमदनगर – उमेर सय्यद –

अहमदनगर शहरांतील मुकुंदनगर या उपनगरातील वार्ड क्रमांक 10 येथे रस्ते खोदाई निधी अंतर्गत रस्ता सिमेंट कॉंक्रिटीकरण कामाला सुरवात करण्यात आली आहे ! गेल्या अनेक दिवसांपासून मुकुंदनगर या उपनगरात रस्त्याची दुरवस्था झाली होती मात्र नगरसेवक समद खान आणि नगरसेवक सलीम शेख (भंगारवाले) यांच्या प्रयत्नाने वार्ड 10 मधिल सर्व रस्ते सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे !

दरम्यान 8 लाख रुपये खर्च करण्यात आलेल्या या कामामुळे वार्ड क्रमांक 10 मधिल नागरिकांनी लोकप्रतिनिधी यांचं कौतुक केलं आहे ! तर येणाऱ्या काळात मुकुंदनगर या उपनगरात विविध निधी अंतर्गत विकास कामे करणार असल्याची माहिती यावेळी या भागातील लोकप्रतिनिधी यांनी दिली आहे