दुचाकींची समोरा समोर धड़क : 4 जखमी

0
595
Google search engine
Google search engine

दयालसिंग चव्हाण ,बुलडाणा

बुलडाणा :- जिल्ह्यातील खामगाव येथे दि.22 डिसेंबर रोजी दुचाकीने रस्ता ओलंडत असताना भरधाव दुचाकीने समोरा समोर धड़क दिल्याने 4 जन जखमी झाल्याची घटना खामगाव येथील राष्ट्रिय शाळेजवळ घडली .

प्राप्त माहिती नुसार स्थानिक चिखली रोड वरील नीळकंठ नगर भागातील मांगीलाल बाबुराव शर्मा वय 70 हे 22डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजे दरम्यान त्यांच्या नातू अक्षद सुभाष शर्मा वय 14 याला शिकवनी वर्गास शिवाजी वेस कड़े अक्टिव्हा दुचाकी क्र एम . एच – 28- ए डी- 5256 ने जात असताना राष्ट्रीय शाळे जवळ रस्ता ओलंडात असताना त्याच वेळी शे शोएब शे अजीज वय 20 व त्याचा मित्र शे फारुख शे गनी वय 22 हे दोघे त्याचे वाहन लूना क्र एम .एच.- 28 – एफ- 5063 ने भरधाव वेगाने चालवुन समोरा समोर जोरदार धड़क दिली या अपघातात मंगिलाल शर्मा ,अक्षद शर्मा , शे शोएब , व् शे फारूक हे चौघजन जखमी झाले यावेळी नागरिकांनी तातडीने ऑटो मधे घेवून जखमीना उपचारासाठी येथील सामन्य रुग्णालयात भरती करण्यात आले तर या घटनेची शिवाजी पोस्टे नला नोंद करण्यात आली या प्रकरणी कोणतीही तक्रार नसल्याने कोणताही गुन्हा दाखल केलेला नव्हता तर या ठिकाणी नेमहिच शाळेच्या विद्यार्थ्यांची व् नागरिकांची वर्दळ असते त्यामुळे अनेक अपघात झालेले आहेत तर येथे मोठा अपघात होवुन जीवित हानी होवू शकते त्या करिता तेथील नागरिकांनी निळकंठ नगर, राष्ट्रीय शाळेजवळ गतिरोधक बसविण्यात यावे अशी मागणी नागरिकाकडून केलि जात आहे