आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार सौर उर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन – आमदार डॉ. अनिल बोंडे यांच्या पुढाकाराने होणार तालुका भारनियमन मुक्त

0
599
Google search engine
Google search engine

तालुक्यातील ९ वीजउपकेंद्रातून मिळणार शेतकऱ्यांना सौरउर्जेचा लाभ

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने अंतर्गत गव्हाणकुंड येथे साकारण्यात येत असलेल्या सौर उर्जा प्रकल्पातील विजेच्या फायदा तालुक्यातील नऊ वीज उपकेंद्रांना होणार असून १८८९६ शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. या प्रकल्पातून मिळणाऱ्या विजेमुळे शेतक-यांना दिवसा मुबलक वीज मिळणार असल्याने पिकांच्या ओलीताचा प्रश्न निकाली निघणार आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने अंतर्गत गव्हाणकुंड येथिल शेकदरी धारण परिसरातील वनजमिनीवर सौर उर्जा प्रकल्प साकारण्यात येत आहे.राज्याचे मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते आज दि.२४ ला या प्रकल्पाचे उदघाटन होत असून शेतकरी हिताच्या या प्रकल्पाकडे शेतकरी डोळे लाऊन बसला आहे.या प्रकल्पातून ३.३३ कोटी युनिट्स वार्षिक वीज निर्मिती अपेक्षित असून ८० कोटीं रुपये खर्ची पडणार आहे..या प्रक्ल्पातून निर्माण होणारी वीज तालुक्यातील टेंभूरखेडा, बेनोडा,लोणी, शेंदूरजनाघाट, पुसला, वरुड येथील ३३ केव्ही.उपकेंद्र आणि पुसला मिल्स, तिवसा येथील ११ केव्ही वीज उपकेंद्रांना पुरविण्यात येणार आहे, या उपकेद्रांतून शेतीसाठी वीज पुरावाठा होत असलेल्या १८८९६ शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकणार आहे.गव्हाणकुंड येथिल २० मेगाव्हाट सौर कृषी वाहिनी मधील वीज निष्कासन व्यवस्था व पायाभूत सुविधा उभारण्याची कार्यवाही महावितरण व महानिर्मिती तर्फे करण्यात येणार आहे. गव्हाणकुंड येथिल शेकदरी धरण परिसरातील वनजमिनीवर निर्माण होत असलेल्या सौर उर्जा प्रकल्पामुळे परसारातील शेतकरी सुखावला आहे. भारणीयमनामुळे शेती धोक्यात आली असतांना पिकांसह संत्रा बागा जगवायच्या कशा हा मोठा प्रश्न शेतक-यांसमोर निर्माण झाला होता.दिवसा भारनियमन राहत असल्याने रात्री बेरात्री जीव धोक्यात घालुन ओलितासाठी शेतात जावे लागत होते.अशावेळी शेतका-यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.आमदार डॉ. अनिल बोंडे यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प गव्हाणकुंड यथे होत आहे., तालुक्यातील गव्हाणकुंड येथे शेकदरी धरण परिसरातील वनजमिनीवर हा सौर उर्जा प्रकल्प साकारण्यात येनार आहे.३० हेक्टर पेक्षा अधिक वनजमिनीवर निर्मानाधीन असलेल्या या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा आज दि.२४ डिसेंबरला ला राज्याचे मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते संपन्न होणार असून केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचे अध्यक्षतेखाली होत आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजनप्रसंगी राज्याचे उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उर्जा राज्यमंत्री मदन येरावार, गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील,पालकमंत्री प्रवीण पोटे, यांचेसह खासदार रामदास तडस, खासदार आनंदराव अडसूळ, शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार डॉ.अनिल बोंडे,आमदार डॉ.सुनील देशमुख, आमदार वीरेंद्र जगताप,आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, आमदार यशोमती ठाकूर, आमदार रवी राणा,आमदार रमेश बुंदिले,आमदार प्रभुदास भिलावेकर, मातोश्री त्रिवेणी बोंडे सूतगिरणीच्या अध्यक्ष डॉ.वसुधा बोंडे, वरुडच्या नगराध्यक्ष स्वाती आंडे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा.दिनेश सूर्यवंशी, शेंदुरजनाघाटचे नगराध्यक्ष रुपेश मांडवे, मोर्शीच्या नगराध्यक्ष शीला रोडे, गव्हाणकुंडचे सरपंच नंदकिशोर ब्राम्हणे,उपसरपंच प्रदीप मुरुमकर या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.अशी माहिती पत्रकार परिषदेतून आमदार डॉ.अनिल बोंडे यांनी दिली. यावेळी आमदार डॉ. अनिल बोंडे,डॉ.वसुधा बोंडे, महाजेनको सोलर चे कार्यकारी अभियांता एम.पि.भानारकर,सामाजिक कार्यकर्ते निळकंठ मुरुमकर,भाजपा तालुका अध्यक्ष देवेंद्र बोडखे, अड. शशी उमेकर, मोरेश्वर वानखडे, आदी उपस्थित होते.