शहराच्या विकासकामाकरीता विशेष निधी उपलब्ध करून द्या नगरसेवक श्री मोटवानी यांनी केली खासदारांना मागणी

0
567
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )

 
शहराच्या विकासकामाकरीता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत २ कोटींचा विशेष निधी उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपाचे नगरसेवक तथा गटनेता संजय मोटवानी यांनी खासदार रामदास तडस यांना केली आहे.
स्थानिक नगर परीषदमध्ये कॉंग्रेसची सत्ता असुन भाजपाचे ५ नगरसेवक निवडुण आले आहे. शहरातील प्रभाग १, २, ३ व ८ मध्ये अनेक विकासकामे करायची असुन यासाठी २ कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे सार्वजनिक विभागामार्फत विशेष निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी भाजपाचे नगरसेवक तथा गटनेता संजय तेजुमल मोटवानी यांनी खासदार रामदास तडस यांना केली असुन याबद्दल त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगितले.