*पती ने केला दारू च्या नशेत पत्नीचा गळा दाबून खून*

0
623
Google search engine
Google search engine

महेश कोडापे/ शंकरपूर:

चिमुर तालुक्यातील जवळ असलेल्या व भिशी पोलीस स्टेशन अंतर्गत येनाऱ्या नवतळा या गावात एका विवाहित पतीने आपल्याच पत्नी चा दारूच्या नशेत काल दिनांक 25 डिसें ला रात्रौ च्या सुमारास झोपलेल्या अवस्थेत गळा दाबून खून केला.
सविस्तर वृत्त असे की आरोपी जितेंद्र श्रीराम वाढई वय 28 हा नवतळा या गावांमधील रहिवासी असून मागील वर्षी याचे रीना नावाच्या मुली शी लग्न झाले लग्नानंतर यांचे वैवाहिक जीवन सुखात व आनंदात जात होते. परंतु हे सुखाचे दिवस फार काळ चालले नाही यांच्या संसाराला नियतीची नजर लागली आणि काही कळायच्या आत आरोपी जितेंद्र हा दारू च्या व्यसनात गर्क झाला दारूच्या नशेत पार बुडाला आणि यामुडे कुटुंबात विघन आले जितेंद्र रोज दारू पिऊन यायचा आणि रोज पत्नी सोबत भांडण करायचा अश्याप्रकारे रोज यांच्या घरात पती पत्नी मध्ये वाद विवाद व्हायचे. पत्नी रीना या नेहमी च्या त्रासाला पार वैतागून गेली होती परंतु पती हाच परमेश्वर याप्रमाणे ती जीवन जगत होती पण तिला काय माहीत होते की काळ आपल्यावर चालून येणार याची तिला कल्पना सुद्धा नव्हती.
दि. 25 ला नेहमीच्या सवयी प्रमाणे पती जितेंद्र दारू पिऊन नशेतधूत होऊन घरी आला. पुन्हा पती व पत्नी या दोघात कडाक्याचे भांडण झाले या नंतर दोघेही शांत झाले आणि काही वादानंतर पत्नी रीना नेहमीप्रमाणे झोपी गेलीं तिला काय माहिती होती की ही तिची शेवटची झोप असेल आरोपी नेमकी हीच संधी साधून पत्नी गळा दाबून तीला ठार केले व तिला अंथरूनवरून खाली उतरविले आणि सकाळी पत्नी मृत असल्याचे कळल्याने आरोपी पती याने पळून जाण्याचा प्रयत्नात होता. परंतु या प्रकरणाची चाहूल गावकऱ्यांना लागली. व याबाबत संशय आला आणि त्यानी त्याला रोखले तेव्हा त्यानी स्वतः नातेवाईकांना फोन करून सांगितले त्यानंतर लगेच सकाळी नातेवाईक आले . मुलीच्या वडिलांना व विवाहितेचा कुटुंबियांना यात आकस्मिक मृत्यू बद्दल संशय आल्याने त्यानी पोलीस पाटील यांच्या मार्फत पोलीस स्टेशन भिसीला फोन करून माहिती दिली. घटनेची माहिती पोलिसाना मिळताच पोलीस तापा घटनास्थळी दाखल झाला वं मौका चौकशी करून मृतदेह उत्तरनिय तपासणीसाठी पाठविण्यात आले.
परंतु या हृदयविधारक घटनेचे नेमके कारण काय ? हे अजूनही कडले नाही या घटनेचा तपास पी. एस.आय. सुशील धोपते व इतर पोलिस सहकारी करीत आहेत.