आमदार श्री बच्चू कडू यांच्यावर आसेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद – श्री गोपाल तिरमारे यांची लेखी तक्रार

0
1533
Google search engine
Google search engine

नामांकन सोबत शपथ पत्रात माहिती लपविल्याने आसेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद

चांदुर बाजार / बादलकुमार डकरे –

अचलपूर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार यांनी महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडवणूक2014 मध्ये 042 -अचलपूर मतदार संघातून निवडवणूक करिता निवडवणूक अधिकारी समक्ष नाम निर्देशित पत्रासोबत सादर करावयाचे शपथपत्रामध्ये माहिती लपवली असल्याने त्यांच्या विरुद्ध कलम 125 अ लोकप्रतिनिधी कायदा 1961 कलम 199,200 भादवी कार्यवाही करण्याकरिता चांदुर बाजार येथील नगर सेवक गोपाल तिरमारे आणिआज लेखी तक्रार तालुक्यातील आसेगाव पोलीस स्टेशन दिली.त्यांच्या लेखी आणि जबानी तक्रारीवरून आमदार बच्चू कडू यांच्यावर आसेगाव पोलीस स्टेशन येथे लोकप्रतिनिधींत्व कायदा 1951 आणि 1988 125 अ आणि भारतीय दंड साहित्य 1860 कलम 199,आणि कलम 200 अंतर्गत गुन्ह्याची नोंद पोलिसांनी केली आहे.

अचलपूर मतदार संघाचे सध्या सर्वाना प्रचलित असणारे आमदार ओमप्रकाश बच्चू कडू याच्या विरोधात तक्रार झाली असून आता याच्यावर पोलीस काय कार्यवाही करणार हे पाहावे लागेल.आमदार बच्चू कडू यांनी मुबंई मुबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ वर्सोवा येथील शासनाचे विनयम 13(2)अंतर्गत राजयोग गृहनिर्माण सह संस्थेस मंजूर केलेल्या इमारत क्रमांक 28 गाळा क्रमांक 303 ओमप्रकाश बाबाराव कडू यांनि दिनांक 19/04/2011 रोजी राजयोग गृहनिर्माण सह संस्था चे सदस्य म्हणूम स्वीकृती दर्शवून 42 लाख 40000 रुपये शपथ पत्राद्वारे जमा करून खरेदी करून ताबा घेतला आहे.वरील माहिती निवडवणूक अधिकारी यांच्या पासून लपविण्यात आली आहे.त्यामुळे निवडवणूक आयोग आणि सामान्य जनतेची दिशा भूल केले आहे.अशे ही तिरमारे यांनी आपल्या लेखी तक्रार मध्ये म्हटले आहे