‘बेटी पढाओ’च्या नावाखाली फसवणूकीच्या घटना- ● नागरिकांनी तक्रार नोंदविण्याचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांचे आवाहन

0
744
Google search engine
Google search engine

अमरावती-:

अस्तित्वात नसलेल्या ‘बेढी पढाओ’ योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यासाठी नागरिकांकडून बेकायदेशीरपणे शुल्क वसूल करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. असा प्रकार घडत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तत्काळ तहसीलदार, तसेच पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी केले आहे.
वरुड परिसरात बेटी पढाओ योजना अस्तित्वात असल्याचे दाखवून त्याचा फॉर्म भरुन शुल्क वसूल करण्याच्या घटना घडल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. केंद्र व राज्य शासनाची अशी कोणतीही योजना अस्तित्वात नाही. चुकीची माहिती देऊन काही लोकांकडून नागरिकांची फसवणूक करण्यात येत आहे. अशी चुकीची माहिती देऊन दिशाभूल करणारी व्यक्ती आढळल्यास नागरिकांनी तत्काळ तहसीलदार, तसेच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी. नागरिकांनी याप्रकारच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. बांगर यांनी केले आहे.