शासकीय तूर खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा- तालुका किसान सेने तर्फे निवेदन

0
593
Google search engine
Google search engine

राहुल निर्मळ / जळगाव जामोद :-

तालुका किसान सेनेच्या वतीने सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या समस्या संदर्भात विविध मागण्यांसंदर्भातील निवेदन शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख वासुदेवराव क्षीरसागर ,माजी तालुका प्रमुख संतोष दांडगे, किसान सेनेचे तालुका प्रमुख अशोक टावरी, नगर परिषद माजी उपाध्यक्ष तुकाराम काळपांडे, कृ. उ.बा. चे उपसभापती शांताराम धोटे,ख.वि.समितीचे संचालक संजय भुजबळ,शिवसेना नगर सेवक रमेश ताडे माजी शहरप्रमुख विजय ढगे,उपतालुका प्रमुख मुश्ताक भाईजान यांनी उपविभागीय अधिकारी श्री.धनंजय गोगटे साहेब यांना देण्यात आले त्यामध्ये तालुक्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती असतांना तूर उत्पादक शेतकऱ्यांकरिता शासकीय तूर खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्यात यावे. शेतकऱ्यांची तूर ही खुल्या बाजारात आज रोजी रु.4000/- हजार पर्यंत खरेदी करण्यात येत आहे तुरीचे हमीभाव हे रुपये 5450/- इतके आहे , त्यामुळे सर्व सामान्य शेतकऱ्याची पिळवणूक सध्या व्यापाऱ्यांकडून होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रति क्विंटल रुपये 1500/- पर्यंत नुकसान होत आहेत.त्याचप्रमाणे शेतकरी कर्ज माफी योजनेत तालुक्यातील असंख्य शेतकरी वर्ग हा वंचीत आहे त्या योजनेचा कुठला लाभ खऱ्या अर्थाने मिळाला नाही.तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसंदर्भात कापूस बोडअळी सर्वेक्षणातील जाचक अटीमुळे अनेक शेतकरी आर्थिक लाभापासून वंचित राहू शकतात अशा संदर्भातिल निवेदनात शासकीय तूर खरेदी केंद्र हे येणाऱ्या सात दिवसाचे आत सुरू करावे अन्यथा किसान सेना याप्रकरणी उग्र आंदोलन छेडेल आणि काल धुळे जिल्ह्यातील वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यू ला जबाबदार असणाऱ्यावर कार्यवाही झाली पाहिजे अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांचेकडे करण्यात आली. यावेळी माजी उपशहर प्रमुख एकलव्य पाटील,स्वस्त धान्य संघटनेचे उपाध्यक्ष बंडू पाटील, विभागप्रमुख संतोष पाटील,युवसेना उपशहर अधिकारी पवन तेलंगडे, कैलास मिसाळ, समाधान पाटील, नवाब देशमुख, महादेव लावरे यांचेसह शिवसैनिकांची उपस्तिती होती.