*गणेशोत्सवात शहरातील वाहतूक मार्गात बदल ; पहा वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग*

0
369

*अमरावती, दि. 27 :* अमरावती शहरातील न्यु आझाद गणेश मंडळाचे गणपती विसर्जन मिरवणुक दि. 5 ऑक्टोबर रोजी खापर्डे बगीचा येथून शहरातील विविध भागातून जाणार आहे. या कालावधीत मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. ते याप्रमाणे :

*वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग*

न्यु गणेश मंडळाची गणपती विसर्जन मिरवणुक खापर्डे बगीचा येथून सुरू होवून मिरवणुक इर्विन चौकात आल्यानंतर गर्ल्स हायस्कुल चौकाकडून इर्विन चौका कडे येणारी वाहतुक पोलीस पेट्रोल पंप मार्गे बस स्टँड कडून व बाबा कॉर्नर कडून इर्विन चौकाकडे येणारी वाहतुक लेखुमल चौकाकडे वळविण्यात येईल. विसर्जन मिरवणुक मर्च्यूरी टी पॉइंट ते रेल्वे स्टेशन मार्गाने असतांना रेल्वे स्टेशन चौकाकडून येणारे व मर्च्यूरी टी पॉइंट कडून रेल्वे स्टेशन कडे जाणारी वाहतुक एकतर्फी मार्गाने सुरू राहील. मिरवणुक रेल्वे स्टेशन चौक ते रेल्वे ब्रिजवर आल्यानंतर एस टी स्टँड कडून येणारी वाहतुक उस्मानिया मस्जिद ते खापर्डे बगीचा मार्गाने वळविण्यात येत आहे. तसेच रूख्मीणी नगर कडून हमालपुरा रोडने रेल्वे ब्रिजवर येणारी वाहतुक श्याम नगर चौक ते पोलीस पेट्रोल पंप मार्गाने वळविण्यात येईल.

मिरवणुक रेल्वे ब्रिज ते राजकमल चौक मार्गावर असतांना एसटी स्टँड कडून येणारी वाहतुक रेल्वे स्टेशन कडून मर्च्युरी टी पॉइंट उड्डानपुल व मालवीय चौक, चित्रा चौक या मार्गाने वळविण्यात येईल. तसेच राजकमल चौकाकडून रेल्वे ब्रिजवर येणारी वाहतुक जयस्तंभ चौक, मालवीय चौक मार्गाने वळविण्यात येईल. मिरवणुक राजकमल चौक ते श्याम चौक मार्ग जयस्तंभ चौक मार्गावर असतांना गद्रे चौकाकडून येणारी वाहतुक उड्डानपुल राजापेठ किंवा गांधी चौक जवाहर गेट मार्गाने वळविण्यात येईल. तसेच हमालपूरा कडून येणारी वाहतुक रेल्वे स्टेशन चौक, मर्च्युरी टी पॉइंट मार्गाने वळविण्यात येईल. सदर मिरवणुक जयस्तंभ चौक-दिपक चौक मार्गावर असतांना राजकमल चौकाकडून येणार व जाणार वाहतुक सरोज चौक मार्गे-चित्रा चौक मार्गे जाईल. तसेच चित्रा चौका कडून येणारी वाहतुक दिपक चौक मार्गाने जयस्तंभ चौक किंवा दिपक चौकाकडे जाणाऱ्या मार्गाचा वापर करतील. मिरवणुक दिपक चौक ते मोसीकॉल जिन मार्गावर असतांना विलास नगर कडून येणारी वाहतुक ही लेखुमल चौक, बाबा कॉर्नर मार्गाने वळविण्यात येईल. तसेच दिपक चौक कडून विलासनगर कडे जाणारी वाहतुक इर्विन चौक मार्गे वळविण्यात येईल.

वाहन चालकांनी या अधिसूचनेचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांच्याविरुध्द मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल. हा आदेश दि. 5 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील, असे आवाहन पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी केले आहे.
00000