महाराष्ट्राची भूमि ही संतांची भक्तीधारा – श्री स्वामी अशोकानंद महाराज

0
4425
Google search engine
Google search engine

आकोट / संतोष विनके –

महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे.महाराष्ट्राच्या भूमीत भक्तीधारा आहे.याभूमीत अनेक संतांनी आपली भक्तीधारा वाढवत ईश्वरसेवा केली.असे कथन श्री स्वामी अशोकानंद महाराज यांनी केले.ते गजानन महाराज संस्थांन अकोली.जहाँ.- अकोलखेड येथे आयोजीत श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञात कथेचे पहीले पुष्प गुंफतांना बोलत होते. आपल्या कथा प्रवचनात पुढे बोलतांना ते म्हणाले.परमात्माशी केलेले प्रेम हे परमानंद देणारे आहे.शबरीने श्रीरामाच्या दर्शनासाठी प्रार्थना व प्रतिक्षा केली.कारण गुरुंचे वचन हे खोटे जाणार नाही हे त्यांना माहीती होते.जिथे भक्ती आहे.तिथे ज्ञान आहे व जिथे ज्ञान आहे तिथे वैराग्य आहे.ईश्वरसेवा हे सत्कर्म आहे तर दानधर्म हे शुभकार्य आहे असे ते म्हणाले. कथाप्रवचनाला सुरवात होण्याआधी भागवत ग्रंथ व कथावाचक श्री स्वामी अशोकानंद महाराज यांची टाळ मृदुंगाच्या गजरात कथास्थळीआगमन झाले.मुख्य यजमानांच्या हस्ते ग्रंथ पुजन करुन कथेला सुरुवात करण्यात आली.कथेचा पहील्या दिवसाचा समारोप आरतीने करण्यात आला.त्यानंतर संध्याकाळी हरीपाठ व हरीकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.

गुरुवार प्रतीपदा निमित्य श्रीं ना छप्पनभोग

भागवत ज्ञानकथा यज्ञाचा दुसरा दिवस हा गुरुवार प्रतीपदा आल्याने भाविकांच्या सहभागाने श्रीं ना छप्पनभोग प्रसादाचा नैवेद्य अर्पण करण्यात येणार असुन सकाळी दैनंदिन कार्यक्रमांसह भोजन प्रसादाचे वाटप होणार आहे.