चांदुर रेल्वे शहर स्वच्छ व सुंदर ठेवा – नगरसेविका सौ. स्वातीताई मेटे

0
568
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान .) 

स्वच्छतेचा मंत्र देणारे वंदनीय संत गाडगेबाबा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे स्वच्छतेविषयीचे व गावाचे सुधारणेविषयी किती मोठे योगदान या संतांनी दिले याबद्दल माहिती देऊन आपणही या चांदुर रेल्वे नगरीला प्रत्येक नागरिकांनी आपापल्या घरापासून ते प्रभागापर्यंत सर्व परिसर स्वच्छ सुंदर ठेवावा. तसेच नगरपालिकेची कचरा गाडी आपल्या प्रभागात येते, तेव्हा त्या गाडीमध्ये ओला कचरा हिरव्या रंगाच्या डब्यात टाकावा व सुका कचरा निळ्या रंगाच्या डब्यात टाकावा. आपण महिलांनी व सर्व नागरिकांनी या कामी नगर परिषदला सहकार्य केले तर चांदूर रेल्वे शहर स्वच्छ व सुंदर होईल यात शंका नाही. नागरिकांनी स्वतःच्या घरापासून या स्वच्छतेच्या कामाची सुरुवात करावी. प्रत्येकांनी प्लास्टिकमुक्त शहर ठेवावे व कचरा करू नये तसेच प्रत्येकांनी पाण्याचा योग्य वापर करावा असे आवाहन प्रभाग क्रमांक 7 च्या महिला नगरसेविका सौ. स्वातीताई शैलेंद्र मेटे यांनी केले. त्या शहरातील कृष्णाकृपा व गृहनिर्माण संस्थेतर्फे मेटे कॉलनी येथे कृष्ण वर्धापन दिनानिमित्य आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात बोलत होत्या. या कार्यक्रमामध्ये भागवत कार्यक्रम ह भ प केंद्रे महाराज यांच्या वाणीने संपन्न झाला. यावेळी कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष पंजाबराव मेटे यांनी प्रास्ताविक भाषण केले. संस्थेतील ज्येष्ठ नागरिक सुरेशराव देशमुख व श्रीमती लीलाबाई मुंदडा यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन दिपकराव देशमुख यांनी केले.