स्वछतेचा चांदुर बाजार पंचायत समिती मध्ये अस्वच्छ कार्यभार

0
845
Google search engine
Google search engine

👉🏻स्वच्छ भारत मिशन योजनेचा चांदुर बाजार पंचायत समिती येथे अस्वच्छ कार्यभार.

👉🏻ग्रामीण भागातील सचिव,रोजगार सेवक आणि सरपंच तुपाशी तर पंचायत समिती अधिकारी यांचा यावर दुर्लक्ष पण

चांदुर बाजार :-

स्वच्छ भारत मिशन योजना अंतर्गत स्वछतेला सर्वात जास्त महत्त्व राज्य सरकार कडून देण्यात आले आहे मात्र चांदुर बाजार येथील पंचायत समिती विभागातच या योजने बाबत अस्वच्छ कार्यभार सुरू आहे.जो तो या योजने मध्ये आपली हाती काही न काही लागले पाहिजे हेच एक उद्दिष्ट्ये ठेवत आहे.

ग्रामीण भागात तर स्वच्छ भारत मिशन योजने मध्ये सरपंच रोजगार सेवक आणि ग्रामसेवक हे तुपाशी असल्याचे चित्र आहे.तसेच कोठे तर राजकीय हित संबंध मोठ्या प्रमाणात जपण्यात येत आहे.मात्र याची भनक सुद्धा वरिष्ठ अधिकारी यांना न लागू देता आपले तूप शिजवल्याचे काम ग्रामीण भागात होत आहे.या बाबत अनेक तक्रारी झाल्या पण पंचायत समिती उच्च श्रेणी गटविकास अधिकारी विशाल शिंदे आपल्या कर्तव्य प्रति दक्ष असल्याचे बोलले जात आहे.मात्र ते या अस्वच्छ कार्यभार ला आळा घालणार नाही की नाही?हे त्यांच्या समोरही एक प्रश्न आहे.

स्वच्छ भारत मिशन योजने अंतर्गत 12500 रुपयांचे अनुदान देण्यात येते.त्यामध्ये शौचालय बांधण्यात योग्य बांधकाम व्हावे असे निकष ही देन्यात आले.तर 2011 च्या सर्व्ह मध्ये ज्यांच्या कडे शौचालय नाही त्यांनाच या योजने मध्ये समाविष्ट करण्याचे निकष असताना.कोते राजकीय हित जवळचे समजून चेक चे वाटप करण्यात आले.तर कोठे रोजगार सेवक आणि सरपंच तसेच ग्रामसेवक यांच्या शी आर्थिक खऱ्या लाभार्थी याला दूर ठेवून खोट्या लाभार्थी याचे अनुदान देन्यात आले.हा सर्व प्रकार होत असताना पंचायत समिती येथील मुख्य अधिकारी काय करीत आहे.की या सर्व प्रकरण त्यांच्या सगमताने होत तर नाही ना अशी ही चर्चा आता चांगली च जोर पकडत आहे तर जिल्हा परिषदअमरावती मुख्य अधिकारी याकडे लक्ष देतील का हे पाहावे लागेल.तसेच तत्कालीन मुख्याधिकारी किरण कुलकर्णी यांनी बदली झाली असून नवीन जिल्हा परिषद मुख्याधिकारी चांदुर बाजार प्रश्न उपस्थित होणार काय?आणि त्यावर ते काय कार्यवाही करतील पाहावे लागेल.