तरुणाना व्यसनापासुन परावृत्त करा -: डॉ. श्री राजीव जामठे

0
648
Google search engine
Google search engine

 

टाकरखेडा शंभू येथे संत श्री रविदास जयंती साजरी

प्रतिनिधी/ गजानन खोपे
वाठोडा शुक्लेश्वर :-

 

आजचा तरूण वर्ग व्यसनाच्या खाईत लोटला जात असल्याचे चित्र सर्वत्र दिसत असुन तरूण मुलांच्याकडे समाजातील वयोवृध्द समाजबांधवानी लक्ष ठेऊन तरूणाना व्यसनापासुन परावृत्त करण्याचे काम करावे ही आज काळाची गरज असुन जर हे कार्य आपल्या हातुन घडेल तर देशाला हातभार लावण्याचे महान कार्यच होईल असे मत टाकरखेडा संभु येथे जगद्गुरू श्री.संत शिरोमनी रविदास महाराज जयंती निमित्य आयोजीत कार्यक्रमात डॉ.राजीव जामठे यांनी व्यक्त केले.
टाकरखेडा संभु येथे संत गुरु रविदास महाराज यांच्या ६४१ वी जयंती निमित्य राष्ट्रिय चर्मकार महासंघाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मराठी पत्रकार संघाच्या भातकुली तालुका अध्यक्षपदी पत्रकार संतोष अ.शेंडे यांची निवड झाल्याबद्दल संतोष शेंडे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रविदास विश्व भारती प्रतिष्ठाणचे डॉ.राजीवजी जामठे तर प्रमुख पाहुणे समाजभुषन दलितमित्र सुधाकर विरुळकर,पोलीस पाटील अजय मोहकर,साहेबराव काळे,पत्रकार संतोष शेंडे, राष्ट्रिय चर्मकार महासंघाचे अमरावती जिल्हाध्यक्ष निलेश जामठे, श्रीकृष्ण डाखोडे,कृष्णराव मोहकर हे होते.या कार्यक्रमाला अजाबराव विरुळकर,संजय पिगळे,यांची विशेष उपस्थिती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश जामठे यांनी केले.तर प्रकाश तायडे यांनी आभार मानले.या कार्यक्रमाला दादाराव अंबाडकर,देवराव चापके,सुरेश मोहकर,संजय मोहकर,नागोराव तायडे,जानराव तायडे,अनिल विरुळकर,अशोक जामठे,तुळशीराम विरुळकर,ग्रा.प.सदस्या सोनाली जामठे,माजी उपसंरपच कल्पनाताई मोहकर,महानंदाबाई अंबाडकर,चंदाताई मोहकर,वृषाली डाखोडे,छायाताई मोहकर,छकुली मोहकर,भिमाबाई मोहकर,सोनाली मोहकर,मनकर्णा ताजणे,पुष्पा जामठे,कांन्ता डाखोडे,सारीका अंबाडकर,कल्पना विरुळकर,हिरुबाई मोहकर,रुख्माबाई तायडे,रेणुका तायडे,बेबी विरुळकर,लीला विरुळकर,नंदा तायडे,कोमल मोहकर,मिराबाई जामठे आदीसह गावकरी तसेच समाजबांधवाची उपस्थिती होती कार्यक्रमासाठी प्रफुल अंबाडकर,नंदुभाऊ विरुळकर,पंकज कोथळकर,गजानन विरुळकर,सुमित मोहकर,नितीन जामठे,रविद्र ताजणे, गोपाल तायडे,नागेश डाखोडे,विष्णु तायडे,प्रविण ताजणे यांनी अथक परीश्रम घेतले.