श्रीराम हायस्कुलमध्ये तिन दिवसीय सांस्कृतीक महोत्सव – मान्यवरांचा सत्कार <>विद्यार्थानी सादर केले अविष्कार

0
701
Google search engine
Google search engine

संतोष शेंडे/ टाकरखेडा शंभू –

येथील श्रीराम हायस्कुल कनिष्ठ महाविद्यालयामध्ये तीन दिवशीय सांस्कृतीक महोत्सव उत्सहात पार पडला.यावेळी मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडला.कार्यक्रम उदघाटन संस्थेच्या अध्यक्षा निलांबरीताई देशमुख यांनी केले.दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विद्यार्थाच्या कला गुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या अंतर्गत पहील्या दिवशीय उद्घाटनानंतर विद्यार्थानी कलाविष्कार सादर केला.तसेच गुणवंत सत्कार,विविध स्पर्धाचे आयोजन दोन दिवस घेण्यात आले.तिस-या दिवशी समारोपीय कार्यक्रमात बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी
संस्थेच्या अध्यक्षा निलांबरीताई देशमुख,संरपच चंद्रशेखर गेडाम,पं.स.सदस्या ऊषाताई बोंडे,पोलीस पाटील अजय मोहकर,गौरव राऊत,
मराठी पत्रकार संघाचे भातकुली तालुका अध्यक्ष संतोष शेंडे,
संस्थेचे सदस्य सुरेश देशमुख, इंदूताई देशमुख,संरपच संजय कोकाटे(लसनापुर),संरपच राजेंद्र मकेश्वर(जळका हिरापुर),माजी प्राचार्य आर.डी. खंडार,केचेसर,प्राचार्य एस.जी. देवांग आदीची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन एन पी सांगोले,आभार प्रदर्शन एस एन तायवाडे यांनी केले.यावेळी शिक्षण तथा बांधकाम सभापती जयंत देशमुख यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला.तसेच प्राध्यापक माधुरी देशमुख यांचा निवृत्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी शारदा माहोरे,एस एच शिंदे,एम एस देशमुख,शोभा देशमुख, आर के देशमुख, अजय देशमुख, भागवत,पठानसर,काशीनाथ संके,आर एन धनिया,आदींसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थिती होते.