रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठ स्थापनेचा माणस – महानुभाव पंथीय सत्संग मेळाव्यात आ.डॉ.अनिल बोंडे यांचे प्रतिपादन

0
1391
Google search engine
Google search engine

 

मोर्शी :-

“अनेक भाषा अनेक धर्म, संत संकृती जगात महान, नद्या – पर्वतांची भूमी, विरांची देश माझा हिंदुस्थान – विरांची देश माझा हिंदुस्थान” या युक्तीप्रमाणेच आद्य समाजसुधारक श्री.गोविंदप्रभू महाराज आणि महानुभाव पंथाचे प्रवर्तक भगवान सर्वज्ञ श्री.चक्रधर स्वामी यांच्या पावन स्पर्शाने श्रीक्षेत्र रिद्धपूर ता.मोर्शी परिसर पुनीत झाला आहे, त्याचबरोबर मध्ययुगीन काळात आणि पुढे अनेक समकालीन विद्वान, साहित्यप्रेमी, कवी, लेखकांना भाषा, साहित्य, लिपी यासंबंधात लिखाण स्फूर्ती देण्याचे उल्लेखनीय काम रिद्धपूर नगरीने केले. एकंदरीत महाराष्ट्रातील यादवकालीन भाषासौंदर्य जपण्याचे व संवर्धनाचे मोठे काम याच परिसरात झाल्यामुळे या रिद्धपूर नगरीत मराठी विद्यापीठ स्थापन व्हावे अशी इच्छा आहे, त्यासाठी मी प्रयत्नरत असून शासनाने कडे पाठपुरावा सुद्धा करणार असल्याचे प्रतिपादन मोर्शी-वरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.अनिल बोंडे यांनी महानुभाव पंथीय तालुका स्तरीय सत्संग मेळाव्याच्या उद्घाटनीय भाषणातून बोलतांना व्यक्त केले.

 

आ.डॉ.अनिल बोंडे पुढे म्हणाले कि, मराठी भाषेचा आद्यग्रंथ “लीळाचरित्र” याच रिद्धपूर नगरीत प्रकांड पंडित महिमभट्ट यांनी महानुभाव पंथाचे पहिले आचार्य नागादेवाचार्य यांच्या प्रेरणेने लिहिला गेला आहे, त्यामुळे असे वाजेश्वरी स्थान श्रीक्षेत्र रिद्धपुरातच आहे. मराठी बोली भाषेचा आणि प्रमाण भाषेचा लिखित स्वरूपात पाया घालण्याचे काम लीळाचरीत्राच्या माध्यमातून रिद्धपुरात झाले आहे, त्यासोबतच मराठी भाषेतील अनेक सांकेतिक लीप्यांची रचना व निर्मितीचे ज्ञानकेंद्र म्हणून मध्ययुगीन काळापासून श्रीक्षेत्र रिद्धपूरची ख्याती आहे, आद्य कवयित्री महदंबेचे धवळे रिद्धपुरच्या प्रेरणेने निर्मिले आहेत. तसेच ‘रिद्धपूर वर्णन’ हा सर्वांग सुंदर ग्रंथ याच नगरीत रचला गेला. या पावन भूमीत मध्ययुगीन काळात आणि पुढे अनेक समकालीन विद्वान, साहित्यप्रेमी, कवी, लेखकांना भाषा, साहित्य, लिपी यासंबंधात लिखाण स्फूर्ती देण्याचे उल्लेखनीय काम रिद्धपूर नगरीने केले. एकंदरीत महाराष्ट्रातील यादवकालीन भाषासौंदर्य जपण्याचे व संवर्धनाचे मोठे काम याच परिसरात झाले. तेव्हा अशा या महान भाषिक, सांस्कृतिक, धार्मिक वारसा लाभलेल्या नगरीत ‘माय मराठी विद्यापीठ’ स्थापन व्हावे अशी माझी इच्छा आहे, यासाठी अमरावती जिल्हा महानुभाव परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याबाबतचा प्रस्ताव शासनानेकडे पारित करावा, महानुभाव पंथीय भक्तांच्या वैभवसंपन्न परंपरेचा वारसा जपण्यासाठी मी सदैव्य कटिबद्ध असून मराठी भाषेचे विद्यापीठ रिद्धपुरात निर्मिती व्हावे यासाठी माझा माणस असून मी याकरिता पुरेपूर प्रयत्नरत राहणार असल्याचे मत आ.डॉ.अनिल बोंडे यांनी बोलतांना व्यक्त केले.* *यावेळी भाविक भक्तांसह उपस्थितांनी आ.डॉ.बोंडे यांना सर्मथन देत टाळ्यांचा गजरात त्यांचे स्वागत केले.
महानुभवाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र रिद्धपूर या ग्रामीण तिर्थक्षेत्राचा विकास आराखडा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मंजुरात देऊन मोर्शी-वरुड विधानसभा मतदार संघाचे आ.डॉ.अनिल बोंडे यांच्या पाठपुराव्याने २२ कोटी ३२ लाख रुपयांचा निधीला प्राप्त करून दिला आहे, परंतु आमदार डॉ.अनिल बोंडे यांना स्थानिक मतदारांनी भरघोष मताधिक्यांनी निवडून दिल्याने त्यांचे मन एवढ्यावरच थांबले नसून त्यांनी याच पावन भूमीचे ऋण फेडण्यासाठी तसेच वैभवसंपन्न परंपरेचा वारसा जपण्यासाठी ‘माय मराठी विद्यापीठ’ व्हावे यासाठी प्रयत्न करून मिळवून घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा मानस मी अंगिकारला असल्याचे प्रतिपादन बोलतांना त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी अमरावती जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष प.पु.महंत श्री तळेगावकर बाबा, सचिव संदीप तडस यांनी आमदार महोदयांकडे निवेदन सादर करून ‘माय मराठी विद्यापीठ मिळवून देण्याची मागणी सुद्धा केली. त्याला दुजोरा देत आमदारांनी होकारार्थी उत्तर देऊन सर्वांच्या आशा पल्लवित केल्या आहे.
यावेळी महानुभाव पंथीय तालुका स्तरीय सत्संग मेळाव्याचे उद्घाटक म्हणून मोर्शी-वरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.अनिल बोंडे, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष प.पु.प.म.श्री आचार्य श्री गोपीराज बाबा शास्त्री, अमरावती जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष प.पु.महंत श्री तळेगावकर बाबा, मार्गदर्शक प.पु.प.म.श्री वायनदेशकर बाबा, उपाध्यक्ष प.पु.प.म.श्री सोनपेठकर बाबा, सदस्य प.पु.प.म.श्री भगतराज बाबा, प्रचार मंत्री प.पु.प.म.श्री जायराजबाबा कारंजेकर, प.पु.प.म.श्री देमेराजबाबा बिडकर, सचिव संदीप तडस, मोर्शीच्या नगराध्यक्षा शीला रोडे, मातोश्री त्रिवेणी बोंडे महिला सूतगिरणीच्या अध्यक्षा डॉ.वसुधा बोंडे, कृषी बाजार समितीचे सभापती अशोक रोडे, जि.प.अमरावतीच्या माजी सभापती सौ.वृषाली दिघे, भाजपचे अशोक ठाकरे, समाजसेवक मोहन मडघे यांच्यासह मोर्शी तालुक्यातील महानुभाव पंथीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्याची सांगता “असू दे तुझ्याकडे, एक स्वप्न ध्येयवेडे, चालण्याचा ध्यास अन सूर्य डोळ्यापुढे, अन सूर्य डोळ्यापुढे या गीतांनी संपन्न झाली.